"तू आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही!", प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:59 IST2022-03-22T14:58:53+5:302022-03-22T14:59:43+5:30
Attack Case : एकवीस वर्षीय युवतीने विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने गावातील नंदनवन परिसरातील प्रवीण रावळ जाधव या युवकाविरुद्ध लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे.

"तू आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही!", प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकावर हल्ला
लासलगाव (नाशिक)-पिंपळगाव नजिक येथे सोमवारी (21) प्रेम प्रकरणाचे वादातून युवकावर हल्ला करण्यात आला. यात युवक जखमी झाला असून त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर युवतीने याच युवकाविरोधात विनयभंग झाल्याची फिर्याद दिली आहे.
एकवीस वर्षीय युवतीने विनयभंग केल्याची फिर्याद दिल्याने गावातील नंदनवन परिसरातील प्रवीण रावळ जाधव या युवकाविरुद्ध लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण रावळ जाधव. या युवकावर धारधार शस्त्राने पोटावर हातावर वार केल्याप्रकरणी प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे व दिपक अजय नवले यांनी फिर्यादीचा मुलगा यास मारहाण करून तु आमचे नादी लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सांगितले . पोलिसांचे प्राथमिक माहितीत दोन वर्षापासून युवक व युवती प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याचे दिसून आले आहे.
दुसरी फिर्याद सिमा रावळा जाधव यांनी दिली असून - प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे, दिपक अजय नवले यांनी प्रेम संबंधाचे वादातून मुलगा प्रविण रावळा जाधव याचे पोटावर हातावर वार करून तू आमचे नादी लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे, दिपक अजय नवले यांचेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.