आयएएस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सायबर सेलकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 17:08 IST2021-08-05T17:02:55+5:302021-08-05T17:08:20+5:30
आएएएस अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ मार्च महिन्याच्या अगोदरचा आहे. या अधिकाऱ्यासा हनी ट्रॅपमध्ये अडकवून हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे. महिलेने अगोदर जाळ्यात अडकवून अधिकाऱ्याचा व्हिडिओ बनविला.

आयएएस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सायबर सेलकडून तपास सुरू
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता एका आयएएस अधिकाऱ्याचाही अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिक्षण विभागाच्या विशेष सचिव स्तरावरील अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ असल्याचे समजते. एका महिलेसोबत चॅटींग करताना हा अश्लील व्हिडिओ बनविण्यात आला आहे. लखनौ येथील हे प्रकरण असल्याने लखनौ सायबर सेलने याबाबत चौकशीला सुरुवात केली आहे.
आएएएस अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ मार्च महिन्याच्या अगोदरचा आहे. या अधिकाऱ्यासा हनी ट्रॅपमध्ये अडकवून हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे. महिलेने अगोदर जाळ्यात अडकवून अधिकाऱ्याचा व्हिडिओ बनविला. त्यानंतर, तिने संबंधित अधिकाऱ्याला ब्लॅकमेलही करण्यास सुरुवात केली होती. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ टाकण्यात आला होता. त्यामुळेच, व्हिडिओ व्हायरल होताच आएएएस अधिकाऱ्याने लखनौ पोलीसच्या सायबर विभागात तक्रार दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ या व्हिडिओची दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप संबंधित महिलेला अटक करण्यात आली नाही. पोलिसांकडून महिलेचा शोध घेत अधिक तपास सुरू आहे.