"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:05 IST2025-12-04T16:05:11+5:302025-12-04T16:05:45+5:30
चार निष्पाप मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
हरियाणातील पानिपत येथील भावड गावात पूनमचं नाव सर्वांच्याच तोंडावर आहे. चार निष्पाप मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. पूनमच्या जाऊबाईंनी दिलेल्या माहितीनुसार, "२०२३ पूर्वी ती खूप शांत होती. पण हळूहळू ती बदलू लागली. अनेकदा ती घरी अचानक गप्प बसायची आणि काही मिनिटांनी तिचा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसायचा. तिला काही विचारलं तर ती म्हणायची मी सर्वांचा नाश करेन, पण आवाज तिचा वाटत नसे. आम्ही घाबरायचो. पण काही मिनिटांनी ती पुन्हा सामान्य दिसायची."
पूनमने एमएपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि बी.एड देखील पूर्ण केलं आहे. २०१९ मध्ये तिने नवीनशी लग्न केलं. दोन वर्षांनंतर, २०२१ मध्ये मुलगा शुभमचा जन्म झाला. कुटुंबातील सर्वजण तिला एक समजूतदार, जबाबदार आणि साधी सून मानत होते. पण पूनम कुटुंबातील सुंदर किंवा गोंडस मुलांना पाहून नाराज व्हायची. पूनमला दिराची ६ वर्षांची मुलगी विधीचा अनेकदा राग यायचा.
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
एकदा तिने विधीच्या चेहऱ्यावर गरम चहा ओतला. कुटुंबाने हा अपघात मानला. पण पोलीस चौकशीदरम्यान तिने चहा का फेकला असं विचारलं असता, तिचं धक्कादायक उत्तर होतं, "ती मोठी झाल्यावर खूप सुंदर दिसली असती." कुटुंबातील अनेक सदस्यांचं म्हणणं आहे की, पूनम कधीकधी रात्री शांतपणे उठून व्हरांड्यात बसायची. कधीकधी ती स्वतःशीच बडबडायची, कधीकधी ती दार बंद करायची.
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
कुटुंबीयांनी तिच्या शरीरात कोणतातरी आत्मा प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच मानसिक संतुलन बिघण्याबाबतही भाष्य केलं आहे. संशय टाळण्यासाठी पूनमने तिच्या स्वतःच्या ३ वर्षांच्या मुलाचीही हत्या केली. तिने तिच्या कुटुंबाला सांगितलं की, शुभम पडला होता, इशिका त्याला वाचवण्यासाठी गेली आणि दोघेही बुडाले. कुटुंबीयांना हे खरं वाटलं. कारण आई स्वतःच्या मुलाला मारेल याची कोणीही कल्पना केली नव्हती.