'माझा मित्र होता, त्याने माझा विश्वास जिंकला, नंतर माझ्यावर सामूहिक बलात्कार केला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 16:10 IST2022-07-22T16:09:38+5:302022-07-22T16:10:12+5:30

Gangrape Case : अमेरिकन ब्लॉगरवर हॉटेलमधील खोलीत दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला.

'I had a friend, won my trust, then gang-raped me' | 'माझा मित्र होता, त्याने माझा विश्वास जिंकला, नंतर माझ्यावर सामूहिक बलात्कार केला'

'माझा मित्र होता, त्याने माझा विश्वास जिंकला, नंतर माझ्यावर सामूहिक बलात्कार केला'

पाकिस्तानमध्ये एका अमेरिकन ब्लॉगरसोबत गँगरेप केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडित मुलीने स्वतः सांगितले आहे की, सामूहिक बलात्कारात सामील असलेला एक व्यक्ती तिचा मित्र होता आणि ती त्या व्यक्तीला खूप दिवसांपासून ओळखत होती.

अमेरिकन ब्लॉगरवर हॉटेलमधील खोलीत दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आता अमेरिकन ब्लॉगरने या घटनेचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझ्या एका मित्राला, ज्याला मी बऱ्याच काळापासून ओळखत होते, परदेशी प्रवाशांमध्ये या सुंदर देशाची (पाकिस्तान) सकारात्मक प्रतिमा निर्माण करू इच्छित होता. मला तो मित्र खूप विश्वासार्ह वाटला. पण त्याने माझ्याशी असे घृणास्पद कृत्य केले आहे. या घटनेचा माझ्या मनावर झालेला परिणाम मी कधीच विसरू शकेन असे वाटत नाही. मात्र, या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा आहे.

अमेरिकन तरुणी कायदेशीर प्रक्रियेबद्दल पुढे म्हणाली - कायदेशीर प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. तथापि, आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला आशा आहे की, भविष्यातही असेच चालू राहील आणि शेवटी मला न्याय मिळेल. 

Web Title: 'I had a friend, won my trust, then gang-raped me'