धक्कादायक! अल्पवयीन मुलगी रात्री उशिरा फोनवर बोलत होती, वडिलांनी गळा दाबून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 17:22 IST2022-12-18T17:21:42+5:302022-12-18T17:22:36+5:30
हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुशीराबादमध्ये फोनवर बोलल्यामुळे अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक! अल्पवयीन मुलगी रात्री उशिरा फोनवर बोलत होती, वडिलांनी गळा दाबून केली हत्या
हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुशीराबादमध्ये फोनवर बोलल्यामुळे अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यंतरी शनिवार-रविवार रात्री एकच्या सुमारास सावत्र पित्याने मुलीचा गळा आवळून खून केला. मोहम्मद तौफिक असे आरोपी वडिलांचे नाव आहे. तौफिकने सावत्र मुलीला रात्री उशिरा फोनवर बोलताना पाहिले आणि रागाच्या भरात वडिलांनी तिचा गळा दाबून हत्या केली.
मोहम्मद तौफिक हा बक्रम भागातील रहिवासी आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली तेव्हा त्यांची सावत्र मुलगी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे त्यांना दिसले. याचा राग तौफिकला आला आणि त्याने फोन हिसकावून घेतला. त्याने आपली मुलगी यास्मिनला फोन अनलॉक करण्यास सांगितले मात्र तिने तसे करण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नाव बदलून विवाहितेला जाळ्यात अडकवलं; अपहरण करून ३ दिवस बलात्कार केला, मग...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तौफिकने यास्मिन उन्निसाची पहाटे तीनच्या सुमारास गळा आवळून हत्या केली. यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. आरोपी वडिलांची चौकशी सुरू आहे. यास्मिन कोणाशी फोनवर बोलत होती हे अद्याप समजू शकलेले नाही.
झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून जिल्ह्याच्या विविध भागात फेकल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणाच्या धर्तीवर स्थानिक लोक या प्रकरणामुळे हैराण झाले आहेत. पीडित रूबिका पहारिया, 22, ही 28 वर्षीय दिलदार अन्सारीची दुसरी पत्नी होती, जो आदिम पहारिया जमातीचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.