शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
2
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
3
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
4
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
5
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
6
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
7
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
8
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
9
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
10
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
11
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
12
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
13
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
14
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
15
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
16
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
17
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
18
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
19
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
20
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट

सॅल्यूट टू यू सर! पोलीस आयुक्त वी.सी. सज्जनार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 21:15 IST

#hyderabadpolice आणि  #DishaCase टॅगचा ट्विटरवर ट्रेंड

ठळक मुद्दे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांचे ट्विटरवर सिंघम, रियल हिरो, सॅल्यूट टू यू सर असं म्हणत खूप कौतुक होत आहे.सकाळपासून ट्विटरवर #hyderabadpolice आणि  #DishaCase या टॅग्सनी धुमाकूळ घातला

हैदराबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्यांनतर सायबराबाद पोलिसांनी शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी पहाटे एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली हैदराबाद पोलिसांनी हा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून हैदराबाद पोलिसांचे कौतुक होत असून पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांचे ट्विटरवर सिंघम, रियल हिरो, सॅल्यूट टू यू सर असं म्हणत खूप कौतुक होत आहे.२००८ मध्ये सज्जनार हे तेलंगणामधील वारंगल येथे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी त्यांनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील तीन आरोपींना गोळ्या घालून खात्मा केला होता. वारंगलमधील मन्नूरजवळ हे एन्काऊंटर करण्यात आले होते. श्रीनिवास, हरिकृष्ण आणि संजय अशी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. काकातिया इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी येथील विद्यार्थींनीवर आरोपींनी अ‍ॅसिड हल्ला केला होता. २०१६ साली नक्षलवादी नईम याला चकमकीत ठार मारण्यात सज्जनर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनतर हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येतील चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्यांचा एन्काउंटर करण्याचा निर्णय व्ही. सी. सज्जनार यांनी घेतला. त्यानंतर सकाळपासून ट्विटरवर #hyderabadpolice आणि  #DishaCase या टॅग्सनी धुमाकूळ घातला आणि तेलंगणा पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील सज्जनार यांचे फोटो ठेवून त्यांचे कौतुक करण्यात आले. कोण आहेत सज्जनार ?व्ही.सी.सज्जनार मूळचे कर्नाटकातील हुबळीचे आहेत. तिथल्या लायन्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. सज्जनार यांचे वडील सी बी सज्जनार टॅक्स कन्सल्टंट आणि समाजसेवक होते. त्यांना वडिलांकडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली. जनतेच्या सेवेसाठी ते पोलीस खात्यात भरती झाले. व्ही सी सज्जनार यांचे बंधू मल्लिकाअर्जुन डॉक्टर आहेत. १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणून ते आंध्रात रुजू झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जनगाव म्हणून पहिलं पोस्टिंग होतं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर काम केलं. सज्जनार महिला आणि बाल सुरक्षेवर विशेष लक्ष देतात. तसेच सायबर क्राईम आणि मानव तस्करीवर विशेष काम करतात. वारंगल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, गुप्तचर विभागाचे  विशेष आयजी, आंध्र एसआयबीचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. मार्च २०१८ पासून ते सायबराबादचे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसcommissionerआयुक्तSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर