पती अचानक घरी आला, पत्नी होती बॉयफ्रेंडच्या मिठीत पाहून पतीचा राग अनावर, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 19:57 IST2022-02-20T19:57:00+5:302022-02-20T19:57:59+5:30

Crime News : प्रेयसीच्या घरी मारहाण झाल्यानंतर आणि 70 हजार रुपये गमावल्यानंतर रवी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने तक्रार अर्ज दिला.

Husband's wife was angry when she saw her boyfriend's hug, then ... | पती अचानक घरी आला, पत्नी होती बॉयफ्रेंडच्या मिठीत पाहून पतीचा राग अनावर, त्यानंतर...

पती अचानक घरी आला, पत्नी होती बॉयफ्रेंडच्या मिठीत पाहून पतीचा राग अनावर, त्यानंतर...

ग्वाल्हेर - मध्य प्रदेशातील भिंड याठिकाणी पती घरी नसताना विवाहित प्रेयसीला भेटायला आलेला तिचा प्रियकर अडचणीत सापडला आहे. पती एका विवाह सोहळ्यासाठी गेला असताना प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. मात्र, काही वेळानं पती घरी येताच मोठा गोंधळ उडाला. 

घरात प्रवेश करताच पतीने प्रियकराला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला बलात्काराच्या प्रकरणात फसवण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून 70 हजार रुपये वसूल केले. तसेच प्रियकराचा माफी मागतानाचा व्हिडीओ या महिलेच्या पतीने तयार करून तो सोशल मीडियावर  व्हायरल केला. 

पिपाहाडी येथील रहिवासी रवी गुर्जर याचे भिंड येथील सैनिक कॉलनीत राहणाऱ्या एका विवाहितेसोबत प्रेम संबंध  होते. पतीच्या गैरहजेरीत ते दोघे भेटत असत. 9 फेब्रुवारीला प्रेयसीचा पती विवाह सोहळ्यासाठी जातो सांगून घराबाहेर पडला. या संधीचा फायदा घेत महिलेनं रात्रीच्या वेळी प्रियकर रवीला घरी बोलावलं. मात्र, महिलेचा पती अचानक रात्रीच घरी परतला. घरात प्रवेश करताच पत्नी प्रियकराच्या मिठीत असल्याचे पाहून पती संतापला.  त्याचा राग अनावर झाला. नंतर पतीने पत्नीच्या प्रियकरला मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण केल्यानंतर पतीने प्रियकरला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. रवीने माफी मागताच पतीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. रवीने त्याचं एटीएम कार्ड प्रेयसीच्या पतीला दिलं. प्रेयसीच्या पतीने त्याच्या मित्राला एटीएममध्ये पाठवत 70 हजार रुपये काढून घेतले. पैसे मिळाल्यानंतर पतीने प्रियकरला या घटनेची माहिती कोणालाही न सांगण्याबाबत सांगितले.

प्रेयसीच्या घरी मारहाण झाल्यानंतर पीडित प्रियकराने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेली घटना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. भिंड जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून मारहाण आणि पैसे वसूलीचे हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. 

Web Title: Husband's wife was angry when she saw her boyfriend's hug, then ...