विवस्त्र फोटो व्हायरलची धमकी देऊन दिराचा वहिनीवर बलात्कार; साताऱ्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 21:33 IST2021-12-15T20:45:02+5:302021-12-15T21:33:59+5:30
मुलांना व पतीला मारून टाकण्याची दिली धमकी

विवस्त्र फोटो व्हायरलची धमकी देऊन दिराचा वहिनीवर बलात्कार; साताऱ्यातील धक्कादायक घटना
सातारा: माणुसकीला काळीमा फासणारी घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली असून, चुलत दिरानेच वहिनीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने हे कृत्य वारंवार केले असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदर घटनेबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता २३ वर्षांची असून, ती मुले आणि पतीसमवेत राहते. तिचा चुलत दीर ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता घरात कोणी नसताना गेला. बॅंकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून वहिनीशी त्याने जवळीक साधली. त्यानंतर त्याने वहिणीवर बलात्कार केला.
सदरप्रकार कोणाला सांगितलास तर मी तुझ्या मुलांना व नवऱ्याला मारून टाकीन, तसेच तुझे विवस्त्र फोटो मोबाइद्वारे व्हायरल करीन, अशी त्याने धमकी देऊन वारंवार वहिनीवर बलात्कार केला. दिराचा अधिकच त्रास जाणवू लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिराचा घृणास्पद प्रकार कथन केला. पोलिसांनी दिराला ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ हे अधिक तपास करीत आहेत.