पतीचं होतं अफेअर, नाराज पत्नीनं बनवला थरकाप उडवणारा प्लॅन; गाढ झोपेत असताना दिली भयानक शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 21:24 IST2023-01-27T21:23:24+5:302023-01-27T21:24:11+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संतोष टोकरे असल्याचे समजते. झोपत्यावेळी त्याची हत्या करण्यात आली.

पतीचं होतं अफेअर, नाराज पत्नीनं बनवला थरकाप उडवणारा प्लॅन; गाढ झोपेत असताना दिली भयानक शिक्षा!
पालघरमध्ये एका महिलेने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेला तिच्या पतीचे अफेअर असल्याची भनक लागली होती. यानंतर तिने काही लोकांच्या मदतीने पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 36 वर्षीय महिलेसह इतर 4 जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संतोष टोकरे असल्याचे समजते. झोपत्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. 20 जानेवारीच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाडा तालुक्यातील कोंडले-बंदनपाडा गावात संबंधित युवक मृतावस्थेत आढळून आला.
गळा दाबून केली हत्या -
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाच्या तपासणीत गळा दाबून संतोषची हत्या केल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याच्या डोक्यालाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या डोक्यावर एखाद्या धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत व्यक्तीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू होते. याची भनक त्या व्यक्तीच्या पत्नीला लागली. यामुळे ती प्रचंड संतापली होती. यानंतर तिने तिच्या पतीला मारण्याचा प्लॅन तयार केला आहे. यानंतर चार आरोपींच्या मदतीने तिने संतोषची हत्या केली. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.