Husband Wife Fight : झोपेत दुसऱ्याच महिलेचं स्वप्न पाहत होता पती; संतापलेल्या पत्नीनं अंगावर टाकलं उकळलेलं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 13:31 IST2022-07-06T13:29:22+5:302022-07-06T13:31:14+5:30
ही धक्कादायक घटना बोलिव्हिया येथे घडली आहे. येथील 'ला पाज' शहरात पती एका दुसऱ्याच महिलेचे स्वप्न पाहत असल्याच्या रागातून पत्नीने त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकले.

Husband Wife Fight : झोपेत दुसऱ्याच महिलेचं स्वप्न पाहत होता पती; संतापलेल्या पत्नीनं अंगावर टाकलं उकळलेलं पाणी
आपण अनेक वेळा नवरा-बायकोची भांडणं पाहिली असतील. अनेकवेळा छोट्या-मोठ्या कारणांवरूनही पती-पत्नीमध्ये भांडण होतात. मात्र, काही वेळा तर, ही भांडणं अगदी हाणामारीपर्यंतही जाऊन पोहचतात. पण, नवरा बायकोचे भांडण झाले आणि त्यात बायकोने नवऱ्याच्या अंगावर उकळेले पाणी टाकले, असे आपण क्वचितच ऐकले असेल. येथे सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संबंधित पत्नीने भांडणामुळे नाही, तर एक स्वप्नामुळे पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकले.
ही धक्कादायक घटना बोलिव्हिया येथे घडली आहे. येथील 'ला पाज' शहरात पती एका दुसऱ्याच महिलेचे स्वप्न पाहत असल्याच्या रागातून पत्नीने त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकले. जेव्हा महिलेने पतीच्या अंगावर उकळलेले पाणी टाकले, तेव्हा पती गाढ झोपेत होता. या घटनेत संबंधित पती मोठ्या प्रमाणावर भाजा आहे. एक दुसरी महिला स्वप्नात आल्याने पतीला ही जीवघेणी शिक्षा मिळाली आहे.
पत्नीला अटक -
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या अंगावर उकळेले पाणी टाकल्यानंतर पत्नी स्वत:च त्याला उपचारासाठी रूग्णालयात घेऊन गेली. तेथेच पोलिसांनी तिला अटक केली. यावेळी दिलेल्या माहितीत ती म्हणाली, की "तिचा पती रात्रीच्या वेळी एका दुसऱ्या महिलेचे स्वप्न पाहत होता, तो तिच्यावर प्रेम व्यक्त करत होता. तेव्हा ती तेथे बाजूलाच उभी होते. मात्र, तिला सहन न झाल्याने, तीने किचनमध्ये जाऊन पाणी उकळले आणि उकळलेले पाणी पती झोपेत असतानाच त्याच्या अंगावर टाकले."
या घटनेची सर्वत्र जबरदस्त चर्चा सुरू असून, पती गंभीर जखमी झाला आहे. त्याचे संपूर्ण शरीर भाजले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही संबंधित महिलेने पतीला दारू पाजून जाळण्याचा प्रयत्न केला होता.