'Husband, Wife and Wo' on Panipat Highway at midnight; Caught redhand | मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

पानिपत : पानिपत राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री अचानक गोंधळ सुरु झाला. येथे 'पती, पत्नी और वो' चा वाद रंगला होता. पती त्याच्या प्रेमिकेसह कारमधून जात होता. तेव्हा तिथे त्याची पत्नी दिरासोबत दबा धरून बसली होती. पतीला रंगेहाथ पकडताच पानिपतमध्ये मोठा वाद रंगला. थोड्य़ाच वेळात कुटुंबीयही जमा झाले. रात्री दोन वाजेपर्यंत हा वाद सुरु होता. 


तरुणाच्या आईने त्याच्या प्रेयसीला तू माझ्या मुलाची पाठ का सोडत नाहीस, असा सवाल केला. यावर प्रेयसीने टाळी एका हाताने वाजत नाही, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवा, तो माझ्यासाठी मरायला तयार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाणार, असे सांगितले. 
हा वाद एवढा विकोपाला गेला की तरुणाने त्याच्याच कारच्या काचा तोडायला सुरुवात केली. या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार मॉडल टाऊन एरियाचा आहे. पती मध्यरात्र झाली तरीही घरी आला नाही, यामुळे पत्नीने दिराला त्याला फोन करून विचारण्यास सांगितले. यावर पतीने थोड्या वेळात पोहोचतोय असे सांगितले. 


संशय आल्याने त्या तरुणाची पत्नी आणि त्याचा भाऊ शोधण्यासाठी बाहेर पडले. जीटी रोडवर एक अॅक्टिव्हा उभी दिसली. ती स्कूटर तरुणाच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीची होती. दीराने वहिनीला याबाबत सांगितले. या तरुणीनेच भावाला फसविले आहे. यावर पत्नी, दीर आणि दोन शेजारी त्या स्कूटरच्या बाजुलाच लपले. जवळपास 12 वाजता कार तिथे आली आणि ती महिला कारमध्ये बसली. तेव्हाच सर्वांनी हाय़वेवर धाव घेत कार थांबविली. दीराने कारची चावी काढून घेतली. तिथून पुढे धुमशान सुरु झाले. पती दारुच्या नशेमध्ये होता. त्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मी प्रेयसीसोबतच जाणार असल्याचे सांगत काचा फोडायला सुरुवात केली. 


पोलिसांनी पोहोचल्यावर याचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. तेव्हा त्या प्रेमिकेने त्यास विरोध केला. कारवाई करा, पण व्हिडीओ बनवू नका, असे तिने सांगितले. यावर तरुण दंगा करू लागला यामुळे पोलिसांनी सर्वांना ठाण्यामध्ये नेले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

समुद्रात इंटरनेटचे जाळे! काही सेकंदांत मुव्ही डाऊनलोड होणार; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

अन्य महत्वाच्या बातम्या...

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

 

Web Title: 'Husband, Wife and Wo' on Panipat Highway at midnight; Caught redhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.