husband was posting live sex with two wives; earned in millions, arrested | विकृती! दोन बायकांसोबतचे ते क्षण लाईव्ह पोस्ट करत होता पती; केली लाखोंची कमाई

विकृती! दोन बायकांसोबतचे ते क्षण लाईव्ह पोस्ट करत होता पती; केली लाखोंची कमाई

विदिशा : मध्य प्रदेशमध्ये एका तरुणाची विकृती समोर आली आहे. दोन तरुणींशी लग्न करून त्यांच्यासोबतचे नाजूक क्षण लाईव्ह व्हिडीओद्वारे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत होता. तसेच याद्वारे पैसे कमवत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. महत्वाचे म्हणजे या त्याच्या विकृतीला वैतागलेल्या पत्नीनेच पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. 


हा तरुण 10 वी पास आहे. त्याने दोन तरुणींशी लग्न केले आहे. या पत्नींसोबतचे क्षण तो लाईव्ह करून लाखो रुपये कमवत होता. त्याच्या दोन्ही पत्नींना याची माहिती होती. चांगल्या भविष्यासाठी असल्याचे सांगून तरुणाने त्यांचे मन वळविले होते. काही काळाने दुसऱ्या पत्नीने त्याला विरोध केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. 


विदिशा पोलिसांनुसार एका तरुणीला माधव महाराज असल्याचे सांगत लग्न केले. याआधी त्याने आणखी एका तरुणीसोबत लग्न केले होते. जेव्हा त्याने दुसऱ्या पत्नीसोबतचे नाजूक क्षण लाईव्ह केले व ऑनलाईन विकले तेव्हा या प्रकाराचा खुलासा झाला. पोलिसांनी सांगितले की, या तरुणीला फसवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्याने हे व्हिडीओ लाईव्ह विकून गेल्या काही महिन्यांत लाखो रुपये कमावले होते. पिडीत तरुणीने जेव्हा पोलिसांत तक्रार केली तेव्हा हा प्रकार समोर आला आणि पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. 


सीएसपी विकास पांडे यांच्या म्हणण्यानुसार आज्ञाराम कॉलनीत राहणाख्या चंद्रजीत अहिरवार आणि माधव यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीने ललितपूरच्या एका तरुणीला फेसबुकवर फसवून लग्न केले. आध्यात्मिक गुरुचा शिष्य असल्याचे त्याने तिला सांगितले होते. यानंतर त्याने एका टँगो अॅपद्वारे तरुणीचे व्हिडीओ ऑनलाईन पोस्ट केले. याद्वारे त्याने तीन बँक खात्यांमध्ये 6 लाख रुपये जमविले होते. 
 

Web Title: husband was posting live sex with two wives; earned in millions, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.