शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

दिरासोबतच्या अनैतिक संबंधात पती ठरत होता अडथळा, मग पत्नीनेच आवळला त्याचा गळा, गुन्हा लपवण्यासाठी रचलं असं कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:41 PM

Crime News: अनैतिक संबंधांचा शेवट हा अखेरीच वाईटच होत असतो. अशीच एक घटना छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात घडली आहे.

बलरामपूर (छत्तीसगड) - अनैतिक संबंधांचा शेवट हा अखेरीच वाईटच होत असतो. अशीच एक घटना छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील सनावल पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावामध्ये १७ जुलै रोजी झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांना पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आल्यानंतर केला आहे. (Husband was an obstacle in his illicit relationship with Brother-in-law, then his wife strangled him, a conspiracy to cover up the crime)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार या व्यक्तीची हत्या त्याच्या धाकट्या वहिनीच्या नातेवाईकांनी नव्हे तर त्याच्याच पत्नीने दोरीने गळा आवळून केली आहे. या महिलेने ही हत्या दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या मार्गामध्ये पती अडथळा बनत असल्याने केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पत्नीने इतरांना हत्येच्या प्रकरणात अडकवण्यासाठी हे कारस्थान रचले होते. मात्र पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर तीच या प्रकरणात अडकली.

आरोपी महिलेचे दोन वर्षांपासून तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. १२ जुलै रोजी आरोपी महिला आणि दिराला अनैतिक संबंध ठेवताना दिराच्या पत्नीने पाहिले होते. त्यावरून त्या पती-पत्नीमध्ये खूप वाद झाला होता. त्यानंतर या महिलेने दिराच्या पत्नीने या प्रकरणाबाबत कुणाशी काही बोलू नये म्हणून एक कारस्थान रचले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेने तिच्या पतीला धमकावून  मद्य प्राशन करायला लावले. त्यानंतर त्याला दिराच्या पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र पीडित महिलेने या घटनेमुळे धक्का बसल्याने थेट माहेर गाठले आणि नातेवाईकांना याची माहिती दिली.  त्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला बोलावून त्यांचा समाचार घेतला तसेच त्यांना मारहाणही केली.

त्यानंतर आरोपी महिलेने पतीला रुग्णालयात दाखल केले आणि नवे कारस्थान रचले. त्यानुसार तिने पतीची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा आळ दीराच्या पत्नीच्या नातेवाईकांवर येईल अशी तजवीज केली. तसेच दिराच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आपल्या पतीला मारहाण करण्यात आली. त्यात गंभीर जखमी होऊन पतीचा मृत्यू झाला, असा दावा या महिलेने केला. मात्र पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे या महिलेचे सारे कारस्थान उघड झाले.

याबाबत पोलीस अधिकारी अमित बघेल यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तेव्हा या व्यक्तीचा मृत्यू हा मारहाणीमुळे नाही तर गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेची कसून चौकशी केली असता तिने पतीची हत्या केल्याचे कबुल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारChhattisgarhछत्तीसगड