स्वतःच्या पत्नीचा खासगी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीला रीवा जिल्ह्यातील समान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवून ते पॉर्न साइट्स आणि सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पॉर्न स्टार बनण्याच्या इच्छेपोटी त्याने हे सर्व कृत्य केल्याचे समोर आले आहे. शिवम साहू असे या आरोपीचे नाव आहे.
हुंड्यासाठी छळ -मिळालेल्या माहितीनुसार, १० मे २०२५ रोजी पीडिता आणि शिवम साहू यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला. लग्नाच्या वेळी ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी २ लाख रुपये दिले गेले, मात्र उर्वरित रकमेसाठी आरोपी दबाव टाकत होता. आरोपीने डिसेंबर २०२५ मध्ये पत्नीचा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून तो नातेवाईकांना पाठवला आणि सोशल मीडियावरही व्हायरल केला होता. यावर पीडितेने त्याला विरोध केला असता, शिवमने तिला बदनाम करण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपीला अश्लील साहित्य पाहण्याचे व्यसन होते आणि 'फेमस' होण्याेसाठी तो पॉर्न स्टार बनू इच्छित होता, असे तपासात असे समोर आले आहे.
व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आरोपी मुंबईत लपून बसला होता. १२ फेब्रुवारी रोजी तो सशस्त्र आपल्या सासरच्या मऊगंज भागात पोहोचला आणि कुटुंबाला धमकावू लागला. माहिती मिळताच पोलिसांनी घेराबंदी करून त्याला अटक केली. पोलिसांनी हुंडाबळी, धमकी आणि आयटी ॲक्टअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केलाआहे.
दरम्यान, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, असे सीएसपी राजीव पाठक यांनी सांगितले.
Web Summary : A man in Rewa was arrested for filming and sharing his wife's explicit videos online, aspiring to become a porn star. He harassed her for dowry and threatened her. Police filed charges under dowry, IT Act.
Web Summary : रीवा में एक व्यक्ति को अपनी पत्नी के अश्लील वीडियो ऑनलाइन साझा करने के आरोप में गिरफ्तार किया गया, वह पोर्न स्टार बनना चाहता था। उसने दहेज के लिए उसे प्रताड़ित किया और धमकी दी। पुलिस ने दहेज और आईटी एक्ट के तहत मामला दर्ज किया।