माझ्या मित्रासोबत दररोज संबंध ठेव; नवऱ्याने स्वत:च्या बायकोला बजावले, त्यानंतर वेगळच घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 12:49 IST2021-09-27T12:49:22+5:302021-09-27T12:49:35+5:30
अहमदनगरमधील घटना

माझ्या मित्रासोबत दररोज संबंध ठेव; नवऱ्याने स्वत:च्या बायकोला बजावले, त्यानंतर वेगळच घडलं!
अहमदनगर: अहमदनगरमधील पार्थार्डीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेच्या पतीनेच मित्रासह मित्रासह पत्नीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा पती व त्याचा मित्र अशा दोघांवर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
एक वर्षापूर्वी विवाहितेचे लग्न झाले होते. त्यानंतर आठच महिन्यात पती त्रास देऊ लागला. त्यामुळे विवाहिता आई-वडिलांकडे रहायला गेली होती. मागील महिन्यात विवाहिता पाथर्डी तालुक्यातील तिच्या आजोबांकडे राहण्यास आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच तिचा पती आजोबाच्या घरी आला. तिला पुन्हा सासरी नांदायला घेऊन आला.
डॉक्टर तरुणीवर बलात्कार; त्यानंतर तिच्याच आई- वडिलांना पाठवला व्हिडिओ, औरंगाबादमधील प्रकार
२२ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास पत्नी झोपलेली असताना पती त्याच्या मित्रासोबत घरात आला. मूल होण्यासाठी मित्रासोबत शरीरसंबंध ठेव, असे पतीने सांगितले. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर पती व मित्राने पत्नीला बळजबरीने दोन गोळ्या चारल्या. त्यानंतर पती, मित्र यांनी अत्याचार केला, असे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.
मूल होण्यासाठी ठेव मित्राबरोबर संबंध-
मूल होण्यासाठी मित्राबरोबर दररोज संबंध ठेव, असे पतीने बजावले. यातील कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी २३ सष्टेंबरला रात्री दहा वाजता पती व त्याचा मित्र दोघेही घरी आले. त्यांनी दोघांनी पुन्हा आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर घडलेला प्रकार फोनवरून आई-वडिलांना सांगितला, असे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.
ढूंढते रह जाओगे! 'या' फोटोतील लपलेला उंट शोधून दाखवा; बघा तुम्हाला जमतंय का! https://t.co/wnuzHYOBTA
— Lokmat (@MiLOKMAT) September 25, 2021