पतीला झाडाला बांधले, नंतर पत्नीवर केला गँगरेप; दोन अल्पवयीन मुलांसह १० जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:19 IST2022-03-25T19:16:09+5:302022-03-25T19:19:33+5:30

Gangrape Case : पोलिस अधीक्षक (शहर) अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Husband tied to tree, then gangraped wife; 10 detained including two minors | पतीला झाडाला बांधले, नंतर पत्नीवर केला गँगरेप; दोन अल्पवयीन मुलांसह १० जण ताब्यात

पतीला झाडाला बांधले, नंतर पत्नीवर केला गँगरेप; दोन अल्पवयीन मुलांसह १० जण ताब्यात

मुझफ्फरनगर : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील नई मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका व्यक्तीने पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन अल्पवयीन मुलांसह 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधीक्षक (शहर) अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

क्राइम :बापरे! मुलाने आईचा अश्लिल व्हिडिओ केला व्हायरल, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

              २ वर्षाच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन् केली हत्या

काय आहे संपूर्ण घटना ? 
पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली आहे की, काल ती तिच्या माहेरी पतीसह सासरच्या घराकडून परतत असताना वाटेत दहा जणांनी तिला अडवून आंब्याच्या बागेत नेले. सहा जणांनी तिच्या पतीला बागेतल्या झाडाला बांधून चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. विजयवर्गीय यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली असून दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे. एसएचओ पंकज पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा जबाब लवकरच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला जाईल.

Web Title: Husband tied to tree, then gangraped wife; 10 detained including two minors