शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
6
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
7
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
8
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
9
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
10
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
11
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
12
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
13
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
14
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
15
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
16
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
17
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
18
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
19
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
20
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:38 IST

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या पॅलेस वॉर्डमधील सैन मोहल्ला येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं आणि नंतर तिला छतावरून ढकलून दिलं. गुन्हा केल्यानंतर आरोपी घराच्या वरच्या मजल्यावर लपला. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आरोपी पती नंदलालला शोधून अटक केली.

पत्नी यामध्ये ५०% भाजली आहे, तिला झोनल हॉस्पिटल मंडी येथून एम्स बिलासपूर येथे रेफर करण्यात आलं. ही महिला आणि नंदलाल हे मूळचे धरमपूरचे आहेत, ते बऱ्याच काळापासून मंडीमध्ये राहत आहेत. नंदलाल याचं मंडीमध्ये एक दुकान आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. महिला देखील एका दुकानात काम करते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

शुक्रवारी नंदलाल आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. शनिवारी संध्याकाळीही त्यांच्यातील वाद टोकाला गेला. नंदलालने घरात असलेलं अ‍ॅसिड त्याच्या पत्नीवर फेकलं आणि तिला छतावरून ढकललं. त्यानंतर तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर लपला. शेजाऱ्यांनी महिलेला मंडी येथील झोनल हॉस्पिटलमध्ये आणलं, जिथे ती ५०% भाजली होती.

घटनेची माहिती मिळताच एएसपी अभिमन्यू वर्मा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितलं की, घरात भांडी स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅसिड ठेवण्यात आले होते. वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर तिच्या पतीने अ‍ॅसिड फेकलं आणि छतावरून ढकललं.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband throws acid, pushes wife off roof in Mandi.

Web Summary : In Mandi, Himachal Pradesh, a man attacked his wife with acid and pushed her from the roof after a dispute. The wife is 50% burnt and hospitalized. The husband has been arrested.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस