पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने लावून घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:59 IST2021-05-12T21:25:46+5:302021-05-13T08:59:18+5:30
Suicide Case : जामखेड शहरातील घटना : चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने लावून घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिले...
जामखेड : पत्नीपाठोपाठ पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात बुधवारी (दि. १२) दुपारी घडली. विशेष म्हणजे या दाम्पत्याचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. अजय कचरदास जाधव (वय ३२), शिल्पा अजय जाधव (वय २८, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
अजय व शिल्पा या दोघांचा चार महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटात विवाह सोहळा झाला होता. शिल्पा जाधव हिने बुधवारी दुपारी बीड रस्त्याजवळील आदित्य गार्डन शेजारी राहत असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती तिचा पती अजय जाधव यास समजली. त्यानंतर काही वेळातच अजय यानेही शहरातीलच मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पती-पत्नीने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. आहे.यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली.
पतीने लिहिली चिठ्ठी..
पती अजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार असून इतर कोणासही दोषी ठरवू नये, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.