चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 08:26 PM2022-03-21T20:26:18+5:302022-03-21T20:26:40+5:30

Wife Murder Case : या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.व्ही. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Husband sentenced to life imprisonment for wife's murder | चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा

googlenewsNext

उदगीर (जि. लातूर) : पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी पतीस आजन्म कारावास व १५ हजारांच्या दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी ठोठावली.

उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगरातील भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या आरोपी सुरेश भगवान चवळे याने पत्नी मनीषा सुरेश चवळे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करून लाइटच्या फ्लॅश बोर्डच्या वायरने गळा आवळून १० मार्च २०१९ रोजी पत्नीचा खून केला. याप्रकरणी मयताचे वडील विश्वनाथ बिरादार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.व्ही. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हा खटला जिल्हा व सत्र न्या. वाय. पी. मनाठकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षी, पुराव्यांअधारे न्यायालयाने आरोपीस कलम ३०२ भादंविप्रमाणे आजन्म कारावास व १५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून ॲड. एस.आय. बिराजदार यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. बी.व्ही. बिरादार यांनी सहकार्य केले.

Web Title: Husband sentenced to life imprisonment for wife's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.