विवाहित प्रेयसीला रात्री भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता प्रियकर, अचानक आला महिलेचा पती आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 11:55 IST2022-04-15T11:54:58+5:302022-04-15T11:55:22+5:30

UP Crime News : महिलेच्या पतीने नंतर आपल्या भावासोबत मिळून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

Husband saw his wife sleeping with her lover at home, after that he killed her lover | विवाहित प्रेयसीला रात्री भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता प्रियकर, अचानक आला महिलेचा पती आणि...

विवाहित प्रेयसीला रात्री भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता प्रियकर, अचानक आला महिलेचा पती आणि...

UP Crime News :  उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये अनैतिक संबंधातून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक प्रियकर त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. तेव्हाच अचानक महिलेचा पती घरी आला. महिलेच्या पतीने जेव्हा पत्नीच्या प्रियकराला पाहिलं तेव्हा तो संतापला. महिलेच्या पतीने नंतर आपल्या भावासोबत मिळून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेचा पती व त्याच्या भावाला अटक केली. 

मीडिया रिपोर्टनुसार, राहुल नावाचा तरूण गाजियाबादच्या गांधी कॉलनी मुरादनगरमध्ये राहणारा होता. १२ एप्रिलच्या रात्री राहुल महिलेला भेटायला सिकरोड भागात गेला. त्याचवेळी अचानक महिलेचा पती घरी आला. आपल्या घरात पत्नी आणि राहुलला आक्षेपार्ह स्थितीत बघून तो भडकला. त्यानंतर आपला भाऊ विनोदसोबत मिळून त्याने काठ्यांनी राहुलला मारहाण केली. यानंतर पोलिसांनी जखमी स्थितीत राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला.

घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी हत्येचे आरोपी महिलेचा पती अरूण आणि त्याचा भाऊ विनोद यांना अटक केली. याप्रकरणी आलोक दुबे यांनी सांगितलं की, गेल्या मंगळवारी रात्री नंदग्राम पोलीस स्टेशनला सूचना मिळाली की, काही लोक एका तरूणाला मारहाण करत आहेत. यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि जखमी तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 

पोलिसांनुसार, हत्येचा आरोपी अरूण ड्रायव्हर आहे. साधारण ४ वर्षाआधी मृत तरूण त्याच्यासोबत हेल्परचं काम करत होता. त्यादरम्यानच मृत राहुलचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. तेव्हापासून आरोपी आणि त्याच्या पत्नीत वाद सुरू होता. ती पतीपासून वेगळी राहत होती. पण साधारण ३ वर्षाआधी पती-पत्नीमध्ये वाद मिटला. महिला पतीसोबत राहू लागली होती. पण राहुलसोबत तिचे प्रेमसंबंध सुरूच होते.
 

Web Title: Husband saw his wife sleeping with her lover at home, after that he killed her lover