"मुस्कानप्रमाणे बायको मला मारू शकते, ड्रममध्ये पॅक करण्याची दिली धमकी, जीवाला धोका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:59 IST2025-04-02T14:59:07+5:302025-04-02T14:59:49+5:30

पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आहेत आणि ती मेरठच्या मुस्कानप्रमाणे मलाही मारू शकते असं पतीने म्हटलं आहे.

husband reached sp office in hapur said danger of being packed in drum by my wife | "मुस्कानप्रमाणे बायको मला मारू शकते, ड्रममध्ये पॅक करण्याची दिली धमकी, जीवाला धोका..."

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीपासून जीव वाचवण्यासाठी थेट एसपी ऑफिस गाठलं. पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आहेत आणि ती मेरठच्या मुस्कानप्रमाणे मलाही मारू शकते असं पतीने म्हटलं आहे. आपल्या तीन मुलांसह तो एसपींना भेटण्यासाठी आला होता.  पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि तपासाचं आश्वासन दिलं आहे. 

हापूरमध्ये राहणाऱ्या मनोजचं १२ वर्षांपूर्वी लग्न झालं. त्याला तीन मुलं आहेत. लग्नानंतर काही काळाने मनोजला समजलं की त्याच्या पत्नीचे एका नातेवाईकाशी संबंध आहेत. जेव्हा त्याने याचा विरोध केला तेव्हा त्याची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ते मनोजला मारण्याचा कट रचत आहेत. 

ड्रममध्ये पॅक करण्याची धमकी

मेरठमध्ये मुस्कानचा पती सौरभसोबत जे घडलं होतं तेच माझ्यासोबतही घडू शकतं अशी भीती मनोजने व्यक्त केली आहे. मेरठमध्ये मुस्कान नावाच्या महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरला होता. मला ड्रममध्ये पॅक करण्याची धमकीही दिल्याचं मनोजने सांगितलं.

जीवाला धोका

घाबरलेला मनोज त्याच्या तीन मुलांसह एसपी ज्ञानंजय सिंह यांच्या कार्यालयात पोहोचला आणि मदतीसाठी याचना केली. त्याने एसपींना सांगितलं की, त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

"साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा"; ढसाढसा रडत पतीची पोलिसांत धाव, मागितला न्याय

मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका पत्नीने तिच्या पतीला बेदम मारहाण केली. पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने आता न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे. "साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा" असं लोको पायलट असलेला पती म्हणाला. यासोबतच पतीने सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिलं आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी त्याला बेदम मारहाण करत आहे. लोकेश कुमार मांझी हा सतना येथे लोको पायलट आहेत. लोकेशने त्यांच्या पत्नी आणि सासूवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Web Title: husband reached sp office in hapur said danger of being packed in drum by my wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.