'माझा पती काहीच कामाचा नाही, नातेवाईकांसोबत संबंध ठेवण्यास दबाव टाकतो'; पत्नीचे गंभीर आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 16:18 IST2023-01-11T16:18:10+5:302023-01-11T16:18:35+5:30

Crime News : ही घटना मथुरेच्या बॅंक कॉलनीतील आहे. इथे राहणाऱ्या नीलम चौधरीने तिच्या पतीवर गंभीर आरोप लावला आहे. महिलेनुसार, तिचा पती तिच्यावर इतर लोकांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतो.

Husband pressure to sleep with relatives in Mathura UP wife sensational allegations | 'माझा पती काहीच कामाचा नाही, नातेवाईकांसोबत संबंध ठेवण्यास दबाव टाकतो'; पत्नीचे गंभीर आरोप...

'माझा पती काहीच कामाचा नाही, नातेवाईकांसोबत संबंध ठेवण्यास दबाव टाकतो'; पत्नीचे गंभीर आरोप...

Crime News : उत्‍तर प्रदेशच्या मथुरामधून एक धक्कादाकय घटना समोर आली आहे.  इथे पत्नीने पतीवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. पत्नीचा आरोप आहे की,  पती तिला नातेवाईकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतो. पीडित पत्नीने सांगितलं की, पोलिसात तक्रार करूनही तिला काही मदत मिळाली नाही. ती पुढे म्हणाली की, स्थानिक पोलिसांनी पतीवर काहीच कारवाई केली नसल्याने तिला अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत.

ही घटना मथुरेच्या बॅंक कॉलनीतील आहे. इथे राहणाऱ्या नीलम चौधरीने तिच्या पतीवर गंभीर आरोप लावला आहे. महिलेनुसार, तिचा पती तिच्यावर इतर लोकांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतो. तिने याचा विरोध केला तर तिला मारहाण करण्यात आली. यालाच कंटाळून महिलेने पोलिसात पतीविरोधात तक्रार केली आणि पतीपासून घटस्फोट घेण्याचा निश्चय केलाय.

महिलेचा पतीसोबत घटस्फोटावरून वाद सुरू आहे. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यावर चुकीचे आरोप लावतो. ती म्हणाली की, तिच्या पतीच्या नातेवाईकांनी तिला मारहाण केली आणि तिला शिवीगाळही केली. नंतर तिने पोलिसात पतीविरोधात तक्रार दिली तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस हातावर हात देऊन बसले आहेत. त्यामुळे तिला न्याय मिळत नाहीये. त्यामुळे ती एसएसपीकडे तक्रार करण्यासाठी आली आहे. 

पीडितेने सांगितलं की, तिला पती कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि त्याच्याकडून काहीच होत नाही. तिचा पती काकाचा मुलगा, जावई आणि इतर व्यक्तींसोबत संबंध ठेवण्यास सांगतो. त्याने तिचं Whatsapp स्कॅन करून ठेवलं आहे.

Web Title: Husband pressure to sleep with relatives in Mathura UP wife sensational allegations