"ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:47 IST2024-10-25T11:43:16+5:302024-10-25T11:47:57+5:30

लग्न करण्यासाठी पतीने पहिली पत्नी जिवंत असताना देखील तिचं श्राद्ध केलं. एवढंच नाही तर पतीने पत्नीचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले.

husband performed alive wife shraddh kriyakram and got married for second time exposed social media post | "ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न

"ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न

उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरं लग्न करण्यासाठी पतीने पहिली पत्नी जिवंत असताना देखील तिचं श्राद्ध केलं. एवढंच नाही तर पतीने पत्नीचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले. या फोटोमध्ये त्याने "ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो" असं म्हटलं आहे. पूजा हे त्याच्या पत्नीचं नाव आहे.

पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता, त्यामुळे पूजा तिच्या माहेरच्या घरात राहत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून पतीचं हे धक्कादायक कृत्य उघडकीस आल्यानंतर पूजाने न्याय मागितला आहे. ती कन्नौज एसपी कार्यालयात पोहोचली. पती तिच्या दोन मुलांना जबरदस्तीने आपल्याजवळ ठेवत असल्याचा दावा तिने केला आहे. 

कानपूरमधील किदवई नगरची रहिवासी असलेल्या पूजाने सांगितलं की, मार्च २००९ मध्ये कन्नौजमधील तलग्राम भागातील रहिवासी पवन पटेलसोबत तिचा विवाह झाला होता. तिला दोन मुलं आहेत. अडीच वर्षांपूर्वी पवन एका मुलीसोबत पळून गेला, म्हणून पूजा आपल्या मुलांसह कानपूरमध्ये तिच्या पालकांच्या घरी आली आणि तेव्हापासून ती तिथेच राहते. याच दरम्यान, पतीने दुसरं लग्न करून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर फोटोही अपलोड केले.

पूजाने पुढे सांगितले की, मी जिवंत असताना माझा नवरा पवन पटेल यांनी २३ जून २०२३ रोजी माझं श्राद्ध केलं आणि त्यानंतर दुसरं लग्न केलं. पूजाने दिलेल्या माहितीनुसार, एके दिवशी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं की, माझ्या पतीने माझा फोटो पोस्ट करून मला मृत घोषित केलं आहे. माझ्या एका फोटोवर हार होता आणि समोर दिवा, अगरबत्ती जळत होती. ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो असं देखील लिहिलं होतं. 

Web Title: husband performed alive wife shraddh kriyakram and got married for second time exposed social media post