धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:52 IST2025-06-02T17:34:43+5:302025-06-02T17:52:52+5:30

उत्तर प्रदेशमध्ये एका वकिलाची हत्या त्याच्या पत्नीने केल्याचे उघड झाले आहे.

Husband murdered along with father after love marriage You will be shocked to know the reason | धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल

धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या वकील पतीची हत्या पत्नीने केली. सात महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पत्नी आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली.या हत्येचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय. आधी त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता, यावेळी वकीलाने त्याची जात लपवली होती. काही दिवसांनी त्याच्या पत्नीला या गोष्टी कळाल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले, १८ ऑक्टोंबर २०२४ रोजी सासरच्या घरी आलेल्या पतीला त्याची पत्नी आणि सासऱ्याने विष देऊन हत्या केली. मृत्यू झाल्यानंतप पतीला हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा पसरवली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन वडील आणि मुलीला अटक केली.

थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!

माझोला येथील कांशीराम कॉलनीतील रहिवासी असलेले वकील कमल किशोर यांचे २०२१ मध्ये धामपूर येथील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी अर्चना चौहान यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. कमल वकील होते आणि पीसीएस-जेची तयारी करत होते. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कमल धामपूर येथील त्यांच्या सासरच्या घरी गेले. यानंतर १८ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या सासरच्या घरातील खोलीत एका खाटेवर आढळून आला. त्यांच्या पत्नी आणि सासरच्यांनी पोलिसांना त्यांचा मृत्यू छातीत दुखत असल्यामुळे झाल्याचे सांगितले.

कमलचे नातेवाईक मृतदेह मुरादाबादला घेऊन गेले. यावेळी नातेवाईकांना  संशय आला त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे ठरवले. मृत्यूनंतर तीन महिन्यांनी व्हिसेरा रिपोर्ट आला. व्हिसेरा रिपोर्टमध्ये विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले. तपासानंतर माझोला पोलिसांनी धामपूर पोलिसांना अहवाल दिला. मृताच्या वडिलांच्या तक्रार पत्रावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सीओ तपास करत होते. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी कमल किशोरची पत्नी अर्चना आणि सासऱ्यांना अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.

सीओ धामपूर सर्वम सिंह म्हणाले की, कमलने लग्नाच्या वेळी अर्चना आणि तिच्या कुटुंबाला त्याच्या जातीबद्दल सांगितले नव्हते. त्याने प्रेमासाठी अर्चनाशी लग्न केले होते. नंतर त्यांना त्याची जातीची माहिती मिळाली. अर्चना आणि तिच्या कुटुंबाला याचा राग आला. घटनेच्या दिवशी अर्चना यांची आई आणि भाऊ अमरोहाला गेले होते. अर्चना आणि तिचे वडील महिपाल घरी होते. त्यावेळी कमल यांना जेवणात विषारी पदार्थ देण्यात आला होता. 

Web Title: Husband murdered along with father after love marriage You will be shocked to know the reason