लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 11:24 AM2020-08-20T11:24:43+5:302020-08-21T16:43:59+5:30

सीमाचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. यामुळे तिला सासरी जायचे नव्हते. सामाजिक मर्यादा असल्याने सीमा तिच्या समलैंगिक संबंधांवर कोणाशी बोलू शकत नव्हती.

Husband making trouble in lesbian relationship; wife did murder | लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

Next

जोधपूर : जोधपूरमध्ये समलैंगिक संबंधांमुळे सासरी न जाण्यासाठी एका पत्नीने पतीचीच हत्या केली. कृषी विभागाचे अधिकारी चरण सिंह यांची पत्नी सीमाने तिच्या बहिणी आणि अन्य एका ओळखीच्या व्यक्तीसोबत मिळून हत्या केली. एवढेच नाही तर इलेक्ट्रीक ग्राईंडरने चरण सिंह यांच्या शरीराचे तुकडे करून नाल्यामध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


या प्रकरणी बनाड ठाणे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून न्यायायलयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चरण सिंह यांची पत्नी सीमा आणि त्याच्या मेहुण्या बबीता व प्रियांका यांनी एक ओळखीचा व्यक्ती भीयाराम जाट याच्यासोबत मिळून हत्या केली. यानंतर त्याचे शरीर बाथरूममध्ये नेले. तिथे त्यांनी ग्राईंडरद्वारे शरीराचे तुकडे तुकडे केले व नाल्यामध्ये फेकून दिले. हे तुकडे नगर पालिकेच्या सिवेज ट्रिटमेंट प्लांटमध्ये सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती. 


सीमाचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. यामुळे तिला सासरी जायचे नव्हते. चरण सिंह यांच्या लग्नाला खूप वर्षे झाली होती. मात्र, सीमा नांदत नव्हती. यामुळे चरण सिंहने तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. मात्र, सामाजिक मर्यादा असल्याने सीमा तिच्या समलैंगिक संबंधांवर कोणाशी बोलू शकत नव्हती. यामुळे तिने कोणी विचारही करू शकत नाही असे पाऊल उचलले. 
बनाड पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रीक ग्राईंडर व अन्य साहित्य जप्त केले आहे. याशिवाय काही अन्य साहित्य जप्त करायचे आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले

एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब

मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात

Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Web Title: Husband making trouble in lesbian relationship; wife did murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.