पतीकडून पत्नीची निर्दयीपणे हत्या, मेहुणीला फोन करून म्हणाला - 'तुझ्या बहिणीला छतावरून खाली फेकलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 11:36 IST2021-05-28T11:30:42+5:302021-05-28T11:36:26+5:30

हंसराज बदलला असल्याचं निशाला वाटतं आणि ती मामाच्या घरून त्याच्यासोबत गेली. हसंराज तिला प्रेमनगरमद्ये भाड्याने घर घेऊ असं सांगत सोबत घेऊन गेला.

Husband kills wife by pushing from roof in Kota Rajasthan | पतीकडून पत्नीची निर्दयीपणे हत्या, मेहुणीला फोन करून म्हणाला - 'तुझ्या बहिणीला छतावरून खाली फेकलं'

पतीकडून पत्नीची निर्दयीपणे हत्या, मेहुणीला फोन करून म्हणाला - 'तुझ्या बहिणीला छतावरून खाली फेकलं'

राजस्थानच्या (Rajasthan Crime News) कोटा उद्योग नगर भागात एका निर्दयी पतीने निर्दयीपणे आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून तिची हत्या केली. त्यानंतर मेहुणीला फोन करून सांगितलं की, त्याने निशाला छतावरून खाली फेकून मारलं (husband killed wife. या घटनेनंतर आरोपी फरार आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती हंसराज बैरवाचा पोलीस शोध घेत आहेत. (हे पण वाचा : घराच्या वाटणीच्या वादातून सख्या भावाची थोरल्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण; जागीच मृत्यू )

एसएचओ मोहम्मद इब्राहिम यांनी सांगितलं की, मृत निशाचं लग्न १५ वर्षाआधी सुकेतचा राहणारा हंसराजसोबत झालं होतं. या दोघांना २ मुलंही आहेत. गेल्या २ वर्षांपासून त्यांच्यात बरेच वाद सुरू होते. दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. सततच्या भांडणाला कंटाळून निशा पतीला सोडून माहेरी परतली होती. निशाने वडिलांना सांगितलं होतं की, तिचा पती हंसराज तिला मारहाण करतो. त्यामुळे ती त्याला सोडून आली.

भांडण सोडवण्याचं कारण देत हत्या

निशा दोन वर्षापासून आपल्या माहेरीच राहत होती. २ महिन्यांपूर्वी ती कोटामध्ये राहत असलेल्या मामा चंद्रप्रकाशकडे गेली होती. ती कोटाला आल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. तो तिला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता तिच्या मामाच्या घरी पोहोचला. हंसराज तिथे पोहोचून पत्नीला म्हणाला की, आता भांडण संपवून कोटामध्येच भाड्याने घर घेऊ. सोबत राहू.

हंसराज बदलला असल्याचं निशाला वाटतं आणि ती मामाच्या घरून त्याच्यासोबत गेली. हसंराज तिला प्रेमनगरमद्ये भाड्याने घर घेऊ असं सांगत सोबत घेऊन गेला.

'तुझ्या बहिणीची हत्या केली'

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आपल्या पत्नी प्रेम नगर अफोर्डेबल योजनेच्या टॉपप फ्लोरवर घेऊन गेला. तेथूनच त्याने तिला धक्का देऊन खाली पाडलं. ही घटना सायंकाळी ४ वाजता घडली. हे निर्दयी कृत्य केल्यावर हंसराजने निशाच्या लहान बहिणीला फोन केला. तो तिला म्हणाला की, तुझ्या बहिणीला छतावरून ढकलून मारलं. हे ऐकताच घरातील लोक प्रेम नगरला पोहोचले. निशाचा भाऊ अंकितने सांगितलं की, हंसराजला दारू पिण्याची सवय होती. त्यामुळेच तो निशाला सोबत ठेवत होता. निशाला तो नेहमीच मारहाण करायचा.
 

Web Title: Husband kills wife by pushing from roof in Kota Rajasthan