तलवारीने पत्नीचा गळा चिरून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, म्हणाला - 'कर दिया काम तमाम'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:37 AM2021-05-11T10:37:27+5:302021-05-11T10:43:37+5:30

ही घटना जोधपूरच्या पीपरली गावात घडली. असे सांगितले जात आहे की, पतीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. ज्यामुळे त्याने तिची हत्या केली.

Husband killed wife with sword doubt on character police arrested Rajasthan Jodhpur | तलवारीने पत्नीचा गळा चिरून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, म्हणाला - 'कर दिया काम तमाम'

तलवारीने पत्नीचा गळा चिरून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, म्हणाला - 'कर दिया काम तमाम'

Next

राजस्थानच्या जोधपूरमधून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पतीने त्याच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. ही घटना रविवारी उशीरा रात्री झाली. हत्येनंतर पती स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि त्याने पत्नीच्या हत्येची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला. आरोपीची चौकशी करून तपास केला जात आहे. 

ही घटना जोधपूरच्या पीपरली गावात घडली. असे सांगितले जात आहे की, पतीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. ज्यामुळे त्याने तिची हत्या केली. रविवारीच तो पत्नीला माहेरून घेऊन आला होता. त्याच रात्री उशीरा त्याने तलवारीने पत्नीचा गळा चिरला. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. (हे पण वाचा : रस्त्यावर उभा राहण्याच्या वादातून तरुणावर कुऱ्हाड, चाकूनं प्राणघातक हल्ला)

पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन मथुरादास माथुर हॉस्पिटलमध्ये ठेवला आहे. प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण अनैतिक संबंधाचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर बोरानाडा एसीपी मांगीलाल राठोड घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची तपास सुरू केला. पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडला होता.  (हे पण वाचा : शारीरिक संबंधास नकार दिल्याने केला खून; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावार झोपला होता चिमुकला)

हत्येमागचं मुख्य कारण समोर आलं की, आरोपी व्यक्तीला त्याच्या पत्नीवर संशय होता. त्याचं हे दुसरं लग्न होतं आणि पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलागाही होता. पण दुसऱ्या लग्नातून त्याला एकही अपत्य नव्हतं. रविवारी रात्री उशीरा काही कारणावरून दोघात वाद झाला. आणि तेव्हाच त्याने पत्नीची हत्या केली.
 

Web Title: Husband killed wife with sword doubt on character police arrested Rajasthan Jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.