रस्त्यावर उभा राहण्याच्या वादातून तरुणावर कुऱ्हाड, चाकूनं प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:02 PM2021-05-10T22:02:31+5:302021-05-10T22:04:15+5:30

तिघांकडून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; राजापेठ पोलिसानी नोंदवला गुन्हा

in Amravati Youth man attacked with ax and knife over an argument | रस्त्यावर उभा राहण्याच्या वादातून तरुणावर कुऱ्हाड, चाकूनं प्राणघातक हल्ला

रस्त्यावर उभा राहण्याच्या वादातून तरुणावर कुऱ्हाड, चाकूनं प्राणघातक हल्ला

Next

अमरावती: रस्त्यावर उभा राहण्याच्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस सुत्रानुसार, चिनी उर्फ संतोष सोमनाथ यादव (वय ३०, रा. चिंचफैल) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री चिचफैल परिसरात घडली. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी संदीप वावळे (४१), चेतन वावळे (२६) आणि राजेंद्र माने (४८ सर्व रा. चिचफैल) या तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १३ मेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.            

रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चिनी उर्फ संतोष सोमनाथ यादव हा तरुण चिंचफैल परिसरातील रस्त्यावर उभा होता. त्यावेळी आरोपी तेथून जात असताना, त्यांनी संतोषला रस्त्यावर का उभा आहेस असा प्रश्न विचारून हटकले. यावरून त्यांचा वाद उफाळून आला. या वादानंतर आरोपींनी संतोषवर कुऱ्हाड व चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. त्यात संतोष गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी संतोषला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तक्रार फिर्यादी आरती राजेश यादव यांनी राजापेठ ठाण्यात नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अटक तिघांसह एकूण सात जणांविरुद्ध भादविची कलम ३०७,१४३,१४७,१४८ ,१४९ भादवि गुन्हा दाखल केली आहे.
 

Web Title: in Amravati Youth man attacked with ax and knife over an argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app