धक्कादायक! तंबाखू दिली नाही म्हणून पत्नीच्या डोळ्यात जळकं लाकुड खुपसलं, महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:33 IST2021-12-16T17:33:46+5:302021-12-16T17:33:52+5:30

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे.

Husband killed wife in Gariaband distric Chhattisgarh , police arrested him | धक्कादायक! तंबाखू दिली नाही म्हणून पत्नीच्या डोळ्यात जळकं लाकुड खुपसलं, महिलेचा जागीच मृत्यू

धक्कादायक! तंबाखू दिली नाही म्हणून पत्नीच्या डोळ्यात जळकं लाकुड खुपसलं, महिलेचा जागीच मृत्यू

रांची:छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यातून पतीच्या क्रूरतेची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तंबाखू दिली नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोळ्यात जळकं लाकूड घुसवल्याची घटना घडली आहे. इतक्यावरच न थांबता पतीने पत्नीच्या डोक्यातही लाकडाने वार केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला पकडले असून, न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रेश ठाकूर यांनी सांगितले की, आदिवासी ब्लॉक मैनपूरच्या अखलाघाट गावातून एका महिलेचा मृतदेह नाल्यात पडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. रामुलाबाई (52) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती फूलसिंह नेताम (57 वर्षे) यानेच ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. 

आरोपीने दिली खूनाची कबुली
आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याने पत्नीला खायला तंबाखू मागितली होती. पण, पत्नीने तंबाखू न दिल्याच्या रागातून त्यांने चुलीतील जळकं लाकूड बाहेर काढून पत्नीवर हल्ला केला. आधी त्याने पत्नीच्या डोक्यात लाकडाने वार केला आणि नंतर उजव्या डोळ्यात लाकुड खुपसले. यादरम्यान रमुलाबाई जीव वाचवण्यासाठी धावत सुटल्या आणि एका खड्ड्यात पडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

Web Title: Husband killed wife in Gariaband distric Chhattisgarh , police arrested him