पतीला हवीय स्लिम बायको म्हणून ठेवलं उपाशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:50 PM2018-11-07T13:50:48+5:302018-11-07T13:51:28+5:30

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात या पतीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

The husband kept his wishful slim wife as hungry | पतीला हवीय स्लिम बायको म्हणून ठेवलं उपाशी 

पतीला हवीय स्लिम बायको म्हणून ठेवलं उपाशी 

googlenewsNext

पुणे -  पती पत्नीमधील किरकोळ भांडणं, पत्नीवर हुंडा आणण्यासाठी तिचा केला जाणारा छळ अशा घटना अनेकवेळा समोर आल्या आहेत. मात्र, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीला स्लिम बायको हवी म्हणून तिला चक्क त्याने जेवण दिले नाही. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात या पतीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

पुण्यातील उंड्री येथील इस्टेट इस्टोनिया सोसायटीत हे दोघे पती - पत्नी राहत होते. या दोघांमध्ये २००६ ते २०१६ या दहा वर्षाच्या कालावधीत अनेकदा खटके उडाले. हे खटके केवळ पत्नीच्या वाढलेल्या वजनामुळे उडाले होते. तसेच तुझे वजन वाढले आहे असे सांगून पती त्याच्या पत्नीला उपाशी ठेवत होता. आपल्याला उपाशी का ठेवलं? हे विचारतही या दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून येत होता. शेवटी कंटाळून या प्रकरणी पीडित पत्नीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या पीडित महिलेचा पती घर सोडून बावधन येथे राहण्यास गेला. त्याने घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

Web Title: The husband kept his wishful slim wife as hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.