शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

'सर, माझा नवरा नपुंसक...', नवविवाहितेने पोलिस ठाणे गाठले; सासरच्या मंडळींवर केला फसवणुकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 3:32 PM

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील बांदामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. महिलेने तिचा पती नपुंसक असल्याचा आरोप केला असून लग्नाआधी ही गोष्ट लपवून ठेवली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.  महिलेने सासरच्या मंडळींवर हुंडा मागितल्याचा आरोपही केला. तक्रारीत सासरच्यांनी हुंड्यासाठी मारहाण केल्याचे म्हटले आहे.

सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथे १३ वर्षीय मुलाचा खून; उसाच्या फडात आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेच्या पतीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. महिलेने दिलेली माहिती अशी, ६ महिन्यांपूर्वी तिचे हमीरपूर येथे लग्न झाले होते. गेल्या ३ महिन्यांपासून ती तिच्या माहेरच्या घरी राहत होती. पती नपुंसक असल्याचही तक्रारीत म्हटले आहे, तिने पतीला याचे कारण विचारले असता त्याने उत्तरे दिली नाही.

तिच्या सासरच्यांनी ही गोष्ट तिच्या आणि तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवली. एवढेच नाही तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे ती आई-वडिलांच्या घरी आली आणि तिथे राहू लागली. महिलेचे म्हणणे आहे की, तिचे सासरचे लोक तिला धमक्या देतात. तिंदवारी पोलीस ठाण्याचे प्रमुख कौशल सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. यासोबतच हुंड्याच्या मुद्द्यावरही पोलीस कारवाई करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस