सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथे १३ वर्षीय मुलाचा खून; उसाच्या फडात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 09:58 AM2023-12-24T09:58:46+5:302023-12-24T10:01:09+5:30

खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Murder of 13-year-old boy in Hivre; Dead body found in sugarcane, police rushed to the spot | सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथे १३ वर्षीय मुलाचा खून; उसाच्या फडात आढळला मृतदेह

सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथे १३ वर्षीय मुलाचा खून; उसाच्या फडात आढळला मृतदेह

सातारा- कोरेगाव तालुक्याच्या भाडळे खोऱ्यात असलेल्या हिवरे गावात विक्रम विजय खताळ वय १३ वर्ष  या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला व त्याचा मृतदेह उसाच्या फडात टाकण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला असून रात्री उशिरा उघडकीस आला आहे.

ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली असून वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Web Title: Murder of 13-year-old boy in Hivre; Dead body found in sugarcane, police rushed to the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.