पतीकडून पत्नीचा इंटिमेट होतानाचा व्हिडिओ व्हायरल; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:10 PM2023-04-13T12:10:51+5:302023-04-13T12:11:25+5:30

मार्च २०२० साली लग्न झालेल्या जोडप्याचे काही महिन्यांपासून वाद होत होते.

Husband goes viral on wife's obscene video, incident in Dombivli | पतीकडून पत्नीचा इंटिमेट होतानाचा व्हिडिओ व्हायरल; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

पतीकडून पत्नीचा इंटिमेट होतानाचा व्हिडिओ व्हायरल; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

googlenewsNext

डोंबिवली : वादातून पतीने पत्नीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित पत्नीने नोंदविलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात - मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मार्च २०२० साली लग्न झालेल्या जोडप्याचे काही महिन्यांपासून वाद होत होते. यादरम्यान पीडित महिलेच्या पतीने तिचे अश्लील व्हिडीओ काढले. एवढ्यावरच न थांबला त्याने हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील केले. याची माहिती मिळताच या संतापजनक घटनेचा जाब विचारला असता पीडित महिलेला पतीने मारहाणदेखील केली. त्यातच पती दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली, तिने याबाबतही विचारणा केली असता पतीने व कुटुंबाने पीडित महिलेला शिवीगाळ करत धमकावले, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिस ठाण्यात - दाखल केली आहे. यावरून पतीच्या जवळच्या नातेवाइकांविरोधातही दमदाटी, शिवीगाळ करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Husband goes viral on wife's obscene video, incident in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.