दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 21:39 IST2021-11-29T18:39:04+5:302021-11-29T21:39:59+5:30
Gangrape Case : पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.

दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार
मुंबईत एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.