Facebook फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीचा निर्लज्जपणा, पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:50 IST2022-09-03T16:50:08+5:302022-09-03T16:50:51+5:30
Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यात तिने तिचा 28 वर्षीय पती संदीप आरोपी असल्याचं म्हटलं आहे.

Facebook फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीचा निर्लज्जपणा, पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ केला शेअर
Crime News : एका माथेफिरू पतीला सोशल मीडियाची अशी लत लागली की, तो गैरकृत्य करण्यावर उतरला आणि असं काही केलं की, वाचून विश्वास बसणार नाही. ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील आहे. इथे एका तरूणाने फेसबुकवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासली. तरूणाने त्याच्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यात तिने तिचा 28 वर्षीय पती संदीप आरोपी असल्याचं म्हटलं आहे. महिलेने आरोप केला की, तिचा पती दिल्लीच्या उत्तम नगर भागारत राहतो. तो सर्कसमध्ये काम करतो. तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी ती जेव्हा तिच्या आईच्या घरी गेली होती तेव्हा पतीचा व्हिडीओ कॉल आला होता. यादरम्यान महिला बाथरूममध्ये फोन ठेवून त्याच्यासोबत बोलत होती. दरम्यान पतीने तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला.
यानंतर आरोपी संदीपने पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ अपलोड करताच तो व्हायरल झाला. संदीपच्या पत्नीला तिच्या नातेवाईकांचे फोन येऊ लागले होते. यानंतर जेव्हा संदीपच्या पत्नीने व्हिडीओ पाहिला तेव्हा तिला धक्का बसला. तिने लगेच पतीला फोन केला आणि व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितलं. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचं फेसबुक अकाउंट डिलीट केलं आहे.
महिलेने पतीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आणि त्याला तुरूंगात डांबण्याचा आग्रह केला आहे. पोलीस आता आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला पकडण्यात येईल असा दावा केला जात आहे.