पतीला तिसऱ्याचा संशय; पत्नीचे नाक कापून थेट गाठले पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 21:07 IST2020-05-03T21:04:54+5:302020-05-03T21:07:27+5:30

पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करून घेतला असून संबंधीत महिला मात्र या प्रकरणात काही बोलायला तयार नसल्याचे पोलीस अधिकारी आरके पचौरी यांनी सांगितले. 

Husband cutting off his wife's nose in suspect off her affair hrb | पतीला तिसऱ्याचा संशय; पत्नीचे नाक कापून थेट गाठले पोलीस ठाणे

पतीला तिसऱ्याचा संशय; पत्नीचे नाक कापून थेट गाठले पोलीस ठाणे

कानपूर : कानपूरच्या नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रात पतीने संशयातून पत्नीचे नाक कापल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर हा पती थेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे. मात्र, महिलेने याची तक्रार देण्यास नकार देत एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार करून घेतले आहेत. 


पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करून घेतला असून संबंधीत महिला मात्र या प्रकरणात काही बोलायला तयार नसल्याचे पोलीस अधिकारी आरके पचौरी यांनी सांगितले. 
कानपूरला राहणाऱ्या या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर संशयावरून हल्ला केला. यानंतर तो चाकू घेऊन नवाबगंड पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने पत्नीचे नाक कापल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी त्याला घटनास्थळाबाबत विचारले असता त्याने लॉकडाऊनमुळे मी सध्या घरीच असतो. ज्योरा गावात राहत असून मजुरी करतो. रविवारी पत्नीसोबत वाद झालाय यावेळी तिच्या नाकावर हल्ला केल्याचे त्याने सांगितले. 


पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले की, पती गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर संशय घेत होते. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होता. त्याने रविवारी अचानक चाकूने हल्ला केला. मात्र, तक्रार देणार नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी

CoronaVirus वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार; पुरेसे पुरावे सापडल्याचा अमेरिकेचा दावा

खूशखबर! मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार; ई-कॉमर्सला मान्यता

कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप

Web Title: Husband cutting off his wife's nose in suspect off her affair hrb