शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! दारूसाठी पैसे न दिल्याने कापले पत्नीचे ओठ आणि नाक, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:41 IST

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून नवराने टोकाचं पाऊल उचलत पत्नीवर हल्ला केला आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या जोधपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. नशेत असलेल्या पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचं नाक आणि ओठ कापल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून नवराने टोकाचं पाऊल उचलत पत्नीवर अशा प्रकारे हल्ला केला आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेने रुग्णालयातूनच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या प्रतापनगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय महिलेने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली. पती सकाळपासून रात्रीपर्यंत दारू पितो. संध्याकाळी त्याने दारूसाठी काही पैसे मागितले. तेव्हा महिलेने त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून तो प्रचंड चिडला आणि संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याने तिच्या नाकावर आणि ओठांवर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. बाबूलाल असं पतीचं नाव आहे. 

बाबूलाल याने महिलेला सोडले होते. गेल्या काही दिवसांपासून महिला अन्य एका व्यक्तीसोबत राहत होती. त्या व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर बाबुलाल पुन्हा तिच्यासोबत राहू लागला. दारू पिऊन तो तिला मारहाण करत असे. याच दरम्यान त्याने महिलेच्या नाकावर आणि ओठांवर वार केले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

भाजपा नेत्याची दादागिरी! महिला अन् तिच्या मुलीला हॉकी स्टिकने केली बेदम मारहाण, Video व्हायरल

हरियाणाच्या फरीबाद जिल्ह्यामध्ये स्वतःला भाजपा नेता (BJP) सांगणाऱ्या एका व्यक्तीची दादागिरी पाहायला मिळाली आहे. त्याने महिला अन् तिच्या मुलीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भाजपाचा नेता म्हणवणाऱ्या व्यक्तीवर महिलेला मारहाण आणि तिच्या मुलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि आयपीसी कलम 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आला म्हणून मुस्लीम मुलाला बेदम मारहाण, Video व्हायरल

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुस्लीम धर्मीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलाला मारहाण करणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. आरोपीनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा मारहाण करतानाचा व्हिडीओ शेअर झाला आहे. या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन गाझियाबाद पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतRajasthanराजस्थानPoliceपोलिस