संतापजनक! पतीने मित्रांसोबत संबंध ठेवायला लावले, व्हिडिओ बनवला, घटस्फोट मागितल्यावर व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 12:01 IST2022-12-10T11:48:48+5:302022-12-10T12:01:36+5:30
बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंजिनिअर पत्नीने पतीवर खळबळजनक आरोप केले आहेत.

संतापजनक! पतीने मित्रांसोबत संबंध ठेवायला लावले, व्हिडिओ बनवला, घटस्फोट मागितल्यावर व्हायरल करण्याची धमकी
बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंजिनिअर पत्नीने पतीवर खळबळजनक आरोप केले आहेत. पतीने मित्रासोबत संबंध ठेवायला लावले त्याचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे धक्कादायक आरोप पत्नीने पतीवर केले आहेत.
कमी शिक्षित महिला तसेच उच्च शिक्षित आणि स्वतंत्र महिलांना घरगुती हिंसाचार आणि लैंगिक गुन्ह्यांचा धोका कमी नाही. सॅम्पीगेहल्ली, थानीसांद्रा मेन रोड येथील एका 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने तिच्या पतीवर मित्रासोबत संबंध ठेवायला लावले आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ३६ वर्षीय पतीला अटक करण्यात आली आहे.
संतापजनक! संपत्तीसाठी प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलानेच केली हत्या, आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
'तिचा पती इतर पुरुषांशी संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करायचा. त्याने महिलेला त्याच्या दोन मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि त्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले. महिलेने घटस्फोट मागितला असता त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली, अशी माहिती महिलेने पोलिसांनी दिली आहे. या जोडप्याचे एप्रिल 2011 मध्ये लग्न झाले आणि त्यांना एक मुलगा आहे. संपीगेहल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार आरोपी पतीला दारू आणि ड्रग्जचे व्यसन आहे. त्याने महिलेच्या बहिणीला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
पती दारूच्या नशेत असताना मारहाण करायचा असा आरोपही महिलेने केला आहे. घरातील वातावरण सतत बिघडत राहिल्यावर मी माझ्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे तो चिडला. यानंतर तो व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत आहे. महिलेने तिच्या पतीवर गांजाचे व्यसन असल्याचा आरोपही केला.