शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून फरार झालेला पती शिक्रापूर परिसरातून जेरबंद;गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 15:17 IST

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार झालेला पती आत्महत्या करण्याच्या तयारीत होता.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाची कारवाई

पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार झालेला पती आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी व आत्महत्येसाठी तो वापरणार असलेली नायलॉनची दोरी पोलिसांनी जप्त केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मंगळवारी (दि. ७) ही कारवाई केली.   करीम शाह अहमद शेख (वय ६४, सध्या रा. मामुर्डी, मूळ रा. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर हबीदा शेख (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने रविवारी (दि. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास पत्नी हबीदा शेख हिचा लोखंडी पट्टीने वार करून खून केला. त्यानंतर आरोपी याने त्याचा व पत्नी हबीदा हिचा मोबाईल घटनास्थळावर टाकून पळ काढला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.  आरोपी हा पुणे - नगर रस्त्यावरील रांजणगाव परिसरात फिरत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट पाचचे पथक रवाना झाले. दिघी येथील नागरिक मनोज कदम यांच्या मदतीने आरोपी याला पोलिसांनी शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीच्या चारित्र्यावर त्याला संशय होता. तिला त्यापासून परावृत्त करण्याचा आरोपी प्रयत्न करीत होता. परंतु पत्नीच्या वागण्यात बदल झाला नाही. याचा राग आल्याने आरोपीने तिचा खून केला. तसेच स्वत: देखील आत्महत्या करणार असल्याबाबत आरोपीने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते. आत्महत्या करण्यासाठी पिवळ्या रंगाची रस्सी त्याने विकत घेतली होती. रस्सी व चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपीला देहूरोड पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनंजय भोसले, फारूक मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक