पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 19:58 IST2021-12-28T19:58:11+5:302021-12-28T19:58:45+5:30
Crime News : सुनील यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याने जखमी झाले असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात, गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ हनुमाननगर मध्ये राहणारे सुनील कुमार जैयस्वाल यांना शेजारील गामा जैयस्वाल पती-पत्नीचे भांडण सोडविणे महागात पडले. सुनील यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याने जखमी झाले असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगर मध्ये सुनील कुमार जैयस्वाल व गामा जैयस्वाल हे एकमेकांच्या शेजारी राहतात. सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान गामा जैयस्वाल पती-पत्नीचे भांडण सुरू होते. यावेळी शेजारी म्हणून भांडण सोडण्यासाठी गेलेल्या सुनीलकुमार जैयस्वाल यांच्या बायकोला गामा याने हाकलून दिले. पती-पत्नीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या पत्नीला हाकलून का दिले?. याचा जाब सुनीलकुमार याने गामाला विचारला. जाब विचारल्याचे राग येऊन गामा याने सुनील कुमार जैयस्वाल यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. जखमी झालेल्या सुनीलकुमार यांच्यावर रुग्णालयात उलचार सुरू असून गामा जैयस्वाल यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.