शेतीच्या वादातून झालेल्या मारामारीत पती-पत्नी झाले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:56 IST2021-06-04T15:55:23+5:302021-06-04T15:56:05+5:30
Crime News : अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

शेतीच्या वादातून झालेल्या मारामारीत पती-पत्नी झाले जखमी
चांदवड (नाशिक) : तालुक्यातील निंबाळे येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारामारीत पती-पत्नी जखमी झाले. अमृता निंबाळकर व पती अमोल निंबाळकर हे त्यांच्या शेतात काटे तोडत असताना कृष्णा निंबाळकर, रंजना निंबाळकर, कविता निंबाळकर, सागर निंबाळकर (सर्व रा. निंबाळे) हे हातात काठ्या लाठ्या व कुऱ्हाड घेऊन आले व तुम्ही येथे शेती करायची नाही तसेच काटे तोडायचे नाहीत असे म्हणून शिवीगाळ केली.
त्यांना समजावण्यासाठी गेले असता त्याचा राग येऊन कृष्णा निंबाळकर यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने अमृता निंबाळकर व अमोल निंबाळकर यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले. अमृता निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनीच केला तरूणीवर सामूहिक बलात्कार; भावाची मदतीसाठी विनवणीhttps://t.co/Iv0UWOOt7j
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2021