विना मास्क फिरत होते पती-पत्नी, पोलिसांनी रोखल्यावर केली शाब्दिक बाचाबाची; IAS अधिकारी म्हणाले, "यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:25 PM2021-04-19T17:25:59+5:302021-04-19T17:34:20+5:30

दिल्लीच्या दर्यागंज भागात, दिल्ली पोलिसांनी पती-पत्नीला मास्क न लावल्याने गाडीतून जाताना रोखले, मग त्यांनी रस्त्यातच पोलिसांशी हुज्जड घातली.

Husband and wife walking around without masks, verbally arguing when stopped by police; IAS officials said, "to ..." | विना मास्क फिरत होते पती-पत्नी, पोलिसांनी रोखल्यावर केली शाब्दिक बाचाबाची; IAS अधिकारी म्हणाले, "यांना..."

विना मास्क फिरत होते पती-पत्नी, पोलिसांनी रोखल्यावर केली शाब्दिक बाचाबाची; IAS अधिकारी म्हणाले, "यांना..."

Next
ठळक मुद्देच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, ना कर्फ्यू पास होता. पोलिसांनी गाडी थांबविली तेव्हा निरीक्षक व एसआय यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही लोक नियमांचे पालन करीत आहेत आणि काही लोक ते तोडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. रविवारी, दिल्लीच्या दर्यागंज भागात, दिल्ली पोलिसांनी पती-पत्नीला मास्क न लावल्याने गाडीतून जाताना रोखले, मग त्यांनी रस्त्यातच पोलिसांशी हुज्जड घातली,त्यानंतर पोलिसांनी कोविडचे नियम पालन न केल्याबद्दल आणि शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल गुन्हा पोलिसांनी दाखल करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण (आयएएस अधिकारी) यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये शैला आणि तिचा नवरा पोलिस कर्मचार्‍यांशी गैरवर्तन करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याने कर्फ्यू पासदेखील घेतला नव्हता. जेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवले तेव्हा महिलेने गाडीची काच खाली केली आणि म्हणाली, "मी माझ्या पतीला किस करीन, तू मला थांबवशील का?"

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर टिपला आहे. तिचा नवरा देखील ओरडत म्हणाला, तुम्ही माझी गाडी कशी रोखली, मी माझ्या पत्नीसह कारमध्ये आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना मास्क न घातल्याने रोखले होते, त्यामुळे हा पूर्ण प्रकार घडला. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारमधील एक जोडपे वीकएंडच्या कर्फ्यू असूनही मास्क न लावता गाडीतून जात होते, जेव्हा पोलिसांनी त्यांची कार थांबविली तेव्हा त्यांनी त्यांना फैलावर घेण्यास सुरवात केली. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, ना कर्फ्यू पास होता. पोलिसांनी गाडी थांबविली तेव्हा निरीक्षक व एसआय यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली.

 


ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'यूपीएससी मेन्स क्लिअर केलेली मॅडम आहे. कर्तव्यावर तैनात पोलिसांना असभ्य वर्तणुकीची काय शिक्षा होते, कृपया यांना कायद्याने समजून सांगा. ' त्यांनी हा व्हिडिओ १९ एप्रिल रोजी सकाळी शेअर केला होता, त्याला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्युव्स मिळविले आहेत. तसेच 10 हजाराहून अधिक लाईक्स आणि 3 हजार री-ट्वीट झाले आहेत. कमेंट विभागात, लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत ...

 

 

Web Title: Husband and wife walking around without masks, verbally arguing when stopped by police; IAS officials said, "to ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.