युवतीला नशेची गोळी देत जोडप्यानं मुंबईला आणलं; करणार होते देहविक्रीचा सौदा, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:56 IST2022-02-21T18:55:51+5:302022-02-21T18:56:30+5:30
Prostitution Case :मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.

युवतीला नशेची गोळी देत जोडप्यानं मुंबईला आणलं; करणार होते देहविक्रीचा सौदा, पण...
उदयपुरवती : राजस्थानमधील झुंझुनू येथील गुडगौडजी पोलीस स्टेशन परिसरात सिथल गावातील एका मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.
एसएचओ संजय वर्मा यांनी सांगितले की, रिपोर्टनुसार, तीन वर्षांपूर्वी सिथल गावातील एका मुलीने 31 मार्च 2019 रोजी तक्रार दिली होती की,उर्मिला मीना आणि तिचा पती सुनील मीना हे मालसर येथील रहिवासी असून त्यांनी 15 मार्च रोजी तिला धमकी दिली आणि तिला नशीला पदार्थ खायला घालून महाराष्ट्रात नेले. जिथे मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. कट आखून हा सौदा केला जात होता.
पीडितेने सांगितले की, संधी मिळताच तिने त्यांच्यापासून पळ काढला आणि जवळचे पोलीस ठाणे मालवणी गाठले. जिथे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. मात्र, तक्रार दिल्यापासून आरोपी पती-पत्नी वारंवार पीडितेला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. भीतीमुळे मुलगी बारावीची परीक्षाही देऊ शकली नाही. दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिला उर्मिला मीना हिला रविवारी नरसिंगपुरा स्टँड येथून अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.