एकीशी लग्न, दुसरीसोबत वॉटर पार्कमध्ये मज्जा अन् तिसरी...; पत्नीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:44 IST2025-01-06T16:43:58+5:302025-01-06T16:44:19+5:30
पतीच्या आरोपानंतर पत्नीनेही पतीवर पलटवार केला आहे. तिने पतीविरोधात गंभीर आरोप केलेत

एकीशी लग्न, दुसरीसोबत वॉटर पार्कमध्ये मज्जा अन् तिसरी...; पत्नीचा गंभीर आरोप
बस्ती - एकीशी लग्नानंतर मुलगा, दुसरीसोबत वॉटर पार्कमध्ये मज्जा अन् तिसरीसोबत लग्नाचा ड्रामा..ही कुठल्याही सिनेमाची स्टोरी नसून उत्तर प्रदेशातील बस्ती इथल्या युवकाची कहाणी आहे. पतीच्या कृत्याचे पुरावे जेव्हा पत्नीच्या हाती लागले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. एकीकडे पत्नी पतीच्या अनैतिक संबंधांमुळे त्रस्त आहे तर दुसरीकडे पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आहे.
बस्तीच्या तिघरा गावात ही घटना घडली आहे जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. पतीने पत्नीविरोधात तक्रार करत तिचे शिपायासोबत अनैतिक संबंध आहेत असा आरोप केला तर पत्नीने पतीवर एकाहून अधिक लग्न करत खूप साऱ्या मुलींची फसवणूक केल्याचा पलटवार केला आहे. सध्या पोलीस या दोघांच्या आरोपाचा तपास करत आहे. धर्मेश नावाच्या युवकाने त्याची पत्नी आणि शिपाई गिरजा वर्मा यांच्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या दोघांमध्ये अनैतिक संबंध आहेत. शिपाई माझ्या पत्नीला बाईकवरून कुठेतरी घेऊन जात होता तेव्हा मी रोखले तेव्हा शिपायाने धमकी दिल्याचा आरोप पतीने केला. त्याशिवाय शिपायाने मारहाण करून माझ्याकडील काही पैसेही हिसकावले असा दावा पतीने केला.
पतीच्या आरोपानंतर पत्नीनेही पतीवर पलटवार केला आहे. तिने पतीविरोधात गंभीर आरोप केलेत. पतीने अनेक मुलींसोबत संबंध आहेत. त्याने एक दोन नव्हे तर ३ लग्न केलीत. कानपूरमध्ये प्रिया नावाच्या मुलीशी लग्न करून तिला ठेवले आहे. बस्तीत रिमझिम नावाच्या मुलीसोबत लग्न करून तिलाही घरी लग्न करून ठेवले. जेव्हा मी पतीला रंगेहाथ पकडले तेव्हा ती पसार झाली. मी तिथून घरी परतत होते तेव्हा वाटेतच गिरजा वर्मा भेटला. रात्र होती म्हणून तो मला बाईकवरून घरी सोडत होता. तेव्हा रस्त्यात धर्मेशने ३-४ सहकाऱ्यांसोबत आम्हाला रोखले आणि मारहाण करायला लागला असा आरोप पत्नीने पतीवर केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून धर्मेश नावाच्या युवकाने पत्नी आणि शिपाई यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे पत्नीनेही धर्मेशविरोधात पोलिसांना एक पत्र दिले आहे. दोघांच्या तक्रारीवरून पोलिसांना तपास सुरू केला आहे. तपासाच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येईल अशी माहिती अधिकारी स्वर्णिम सिंह यांनी दिली.