विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:08 IST2025-06-15T16:03:08+5:302025-06-15T16:08:16+5:30

एका पुरुषाचे आपल्याच मुलीच्या सासूशी अनैतिक संबंध होते, हे त्याच्या पत्नीला कळताच त्याचे अतिशय धक्कादायक कृत्य केले.

husband affair with daughters mother-in-law suddenly wife become troublemaker husband tries to kill her crime news | विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी पुन्हा एकदा समाजातील बिघडलेल्या नातेसंबंधांची झलक दाखवत आहे. गांधीपार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनीपूर परिसरात एका ५० वर्षीय महिलेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिच्याच पती आणि सासरच्या लोकांनी हा प्रकार केल्याचे समोर येत आहे.

हा अपघात नाही, हल्लाच!

मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा नावाची महिला शनिवारी सकाळी संशयास्पद परिस्थितीत जळालेल्या अवस्थेत आढळून आले. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. यशोदा यांच्या मुलीच्या मते, तिच्या आईवर झालेला हल्ला कुठलाही अपघात नसून, तो मुद्दाम केला गेला होता.

यशोदा यांची मुलगी म्हणाली की, तिच्या वडिलांचे (यशोदा यांचे पती) तिच्या सासूशी अवैध संबंध होते. या नात्याला यशोदा यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळेच रागाच्या भरात त्यांच्या वडिलांनी म्हणजेच यशोदा यांच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी मिळून यशोदा यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तपास सुरू!
या प्रकरणावर पोलिसांनी अधिकृत चौकशी सुरू केली असून, महिलेने दिलेल्या जबाबातही हेच आरोप स्पष्टपणे नमूद केले आहेत. तिची मुलगी आणि मुलाने देखील आपल्या वडिलांवर आणि कुटुंबातील काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याप्रकरणात तक्रारींची चौकशी प्राधान्याने केली जात आहे आणि आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

नातेसंबंधांचा विचित्र चेहरा
याआधीही अलिगढमध्ये एक सासू तिच्या होणाऱ्या जावयासह पळून गेल्याची घटना चर्चेत आली होती. आता पुन्हा अशाच प्रकारच्या विचित्र आणि धक्कादायक नातेसंबंधांमुळे एक महिलेचे जीवन धोक्यात आले आहे.

Web Title: husband affair with daughters mother-in-law suddenly wife become troublemaker husband tries to kill her crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.