गाढ झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 14:25 IST2018-07-02T14:21:33+5:302018-07-02T14:25:31+5:30

महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू

husband absconding after cutting wifes nose while sleeping | गाढ झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

गाढ झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

लखनऊ: छतावर गाढ झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीनं नाक कापताच महिलेनं आरडाओरडा सुरू केला. यानंतर कुटुंबातील सदस्य छतावर पोहोचले. त्यावेळी महिलेच्या चेहऱ्यावरुन रक्ताच्या धारा वाहात होत्या. यानंतर महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिलेचा पती फरार असून पतीच्या भावानं याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

सुनगढीतील बेहरीखेडा गावात राहणाऱ्या हरिशपाल यांनी पोलिसांकडे स्वत:च्या भावाविरोधात तक्रार केली आहे. 'भाऊ रामदास आणि वहिनी सुशीलादेवी शुक्रवारी छतावर झोपले होते. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास अचानक वहिनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. यानंतर घराच्या खालच्या भागातील कुटुंबीय छताकडे धावले. त्यावेळी वहिनीचं नाक समोरुन कापलं गेल्याचं आणि नाकातून रक्तस्राव सुरू असल्याचं आम्ही पाहिलं. तिचे काही दागिनेही गायब होते,' अशी माहिती हरिशपाल यांनी पोलिसांना दिली.
 
सुशीलादेवी यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू असल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. बरेलीतील रुहेलखंड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुनगढी पोलीस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद कासिम यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 
 

Web Title: husband absconding after cutting wifes nose while sleeping