मुंबई - ठाणे ग्रामीण पोलिसांनी भिवंडीतून बोगस निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पुरविणाऱ्या भामट्याला अटक केले आहे. अटक आरोपीचे नाव असिफ झिया निहाद अहमद अन्सारी (वय २५) असं नाव आहे. केवळ १०० रुपयांत अन्सारी स्मार्ट वोटर आयडी पुरवत असे. पोलिसांनी त्याच्याकडून ४५ ब्लँक स्मार्ट कार्ड जप्त केले असून त्यावर भारतीय निवडणूक आयोग असे लिहिलेले होते. अन्सारी हे कार्ड मित्राकडून ज्या व्यक्तीला कार्ड पाहिजे ते नाव छापून घेत असे त्याचा मोबदला म्हणून तो मित्राला एका कार्डमागे ५० रुपये देत असे अशी माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली.
१०० रुपयांत बोगस स्मार्ट वोटर आयडी विकणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 21:23 IST