सावळया रंगामुळे लग्न मोडल्याने तरुणीने केली आत्महत्या; पोरीच्या जाण्याने वडिलांना आला हार्ट अॅटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 19:27 IST2019-03-11T19:27:10+5:302019-03-11T19:27:47+5:30
२० वर्षीय श्वेता कुमारी या मुलीचं दोन - तीन वेळा सावळ्या रंगामुळे लग्न मोडले होते.

सावळया रंगामुळे लग्न मोडल्याने तरुणीने केली आत्महत्या; पोरीच्या जाण्याने वडिलांना आला हार्ट अॅटॅक
झारखंड - दुमका येथील शिव पहाड परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने सावल्या रंगामुळे लग्न मोडल्याने गळफास लावून आत्महत्या केली. आपला पोरीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.
२० वर्षीय श्वेता कुमारी या मुलीचं दोन - तीन वेळा सावळ्या रंगामुळे लग्न मोडले होते. त्यामुळे ती नैराश्येत होती. नुकतेच एका मुळाशी लग्न ठरत होते मात्र ते लग्न देखील सावळ्या रंगामुळे मोडले. त्यांनतर नैऱ्याशेच्या गर्तेत बुडालेल्या २० वर्षीय श्वेताने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील अशोक रजक हे त्यावेळी घरी नव्हते. घरी आल्यानंतर बराच वेळ मुलगी दरवाजा उघडत नव्हती. अशोक यांचे मुलीवर खूप प्रेम होते. नंतर अशोक यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता आपल्या मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह लोंबकळताना पाहून अशोक यांना हृदयविकाराचा धक्का आला. नातेवाईकांनी वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मुलीच्या आत्महत्येबाबत अशोक यांची बऱ्याचदा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जबाब नोंदविण्याचा परिस्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.