कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 05:21 PM2019-09-26T17:21:45+5:302019-09-26T17:33:27+5:30

त्यांच्या पश्चात आई मीराबाई, भाऊ मंगेश, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

how to pay debt; in this tension farmer suicide | कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते होते. कजार्साठी सतत त्यांच्यामागे तगादा सुरू होता. योगेश प्रेमराज चौधरी (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी शेतात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

जळगाव  - कर्जबाजारीपणा व नापिकी यास कंटाळून फुपनगरी,ता.जळगाव येथे योगेश प्रेमराज चौधरी (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी शेतात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. भरत जाधव यांच्या कापसाच्या शेतात त्यांनी आत्महत्या केली.चौधरी यांच्यावर सुमारे सहा लाख रुपये कर्ज होते. खासगी व सहकारी, राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांनी कर्ज घेतले होते. केळी, कापूस व भाजीपाला याची शेती ते करायचे. परंतु मागील हंगामात दुष्काळ व यंदाचा ओला दुष्काळ यामुळे त्यांचे मोठे वित्तीय नुकसान झाले. कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते होते. कजार्साठी सतत त्यांच्यामागे तगादा सुरू होता. अशा स्थितीत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई मीराबाई, भाऊ मंगेश, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: how to pay debt; in this tension farmer suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.