भयंकर! बायको माहेरी गेल्यावर गर्लफ्रेंडला घरी बोलावलं; हत्या करुन शरीराचे तुकडे केले, फ्रिजमध्ये ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:25 IST2026-03-30T12:24:34+5:302026-03-30T12:25:02+5:30

रवींद्रने आपल्या राहत्या घरीच त्याची गर्लफ्रेंड मोनिकाची हत्या केली, त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले.

how navy technician killed girlfriend mounika chops body in fridge like shraddha walker killing | भयंकर! बायको माहेरी गेल्यावर गर्लफ्रेंडला घरी बोलावलं; हत्या करुन शरीराचे तुकडे केले, फ्रिजमध्ये ठेवले

भयंकर! बायको माहेरी गेल्यावर गर्लफ्रेंडला घरी बोलावलं; हत्या करुन शरीराचे तुकडे केले, फ्रिजमध्ये ठेवले

३५ वर्षीय विवाहित असलेल्या रवींद्रचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. संधी मिळेल तेव्हा ते दोघे भेटायचे. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती, याच काळात त्याची गर्लफ्रेंड त्याला भेटायला घरी आली. तिथे एका कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात नेव्ही टेक्नीशियन असलेल्या या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली. 

रवींद्रने आपल्या राहत्या घरीच त्याची गर्लफ्रेंड मोनिकाची हत्या केली, त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्याने मृतदेहाचे काही तुकडे नष्ट केले, तर काही तुकडे फ्रिजमध्येच लपवून ठेवले. कदाचित संधी मिळताच तो त्याची विल्हेवाट लावणार होता. श्रद्धा वालकर हत्याकांडात ज्याप्रमाणे आफताबने कृत्य केलं होतं, अगदी तसेच रवींद्रनेही केलं. मात्र, त्यानंतर तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

विशाखापट्टणममधील गजुवाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. नेव्ही टेक्नीशियनने ज्या महिलेची हत्या केली, तिचं वय २९ वर्षे होतं. जर रवींद्रने स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली नसती, तर कदाचित ही घटना उघडकीस आली नसती. रवींद्र हा विजयनगरम जिल्ह्यातील राजमचा रहिवासी आहे. विवाहित असूनही त्याचे विशाखापट्टणममधील मोनिका नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. 

रिपोर्टनुसार, रवींद्रची पत्नी काही आठवड्यांपूर्वी विजयनगरमला आपल्या माहेरी गेली होती, त्यामुळे तो घरी एकटाच होता. २९ मार्च रोजी दुपारी रवींद्रने फोन केल्यानंतर मोनिका त्याच्या घरी आली. दोघेही अनेक तास घरात सोबत होते, मात्र संध्याकाळी कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झालं. या वादातून रागाच्या भरात रवींद्रने तिच्यावर चाकूने वार केले.

रवींद्रने मोनिकाच्या शरीराचे काही भाग एका बॅगेत भरले आणि निर्जनस्थळी नेऊन नष्ट केले. उर्वरित भाग फ्रिजमध्येच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंतर रवींद्रने स्वतःहून पोलीस ठाण्यात येऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातून शरीराचे काही भाग जप्त केले आहेत, मात्र डोकं अद्याप सापडलेलं नाही. रवींद्रने ते कोठेतरी फेकून दिलं असावं, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. 

Web Title : भयानक: पत्नी के मायके जाने पर प्रेमी को बुलाया, हत्या कर टुकड़े फ्रिज में छुपाए

Web Summary : विवाहित रवींद्र ने मोनिका नाम की अपनी प्रेमिका की हत्या कर दी और उसके शरीर के टुकड़े कर दिए। कुछ टुकड़ों को ठिकाने लगाया और बाकी फ्रिज में छुपा दिए। उसने पुलिस के सामने गुनाह कबूल कर लिया, जिसके बाद शरीर के अंग बरामद हुए। सिर अभी भी गायब है।

Web Title : Horrific: Man Murders Girlfriend, Chops Body, Hides Remains in Fridge

Web Summary : Married Ravindra killed his girlfriend Monica after an argument. He dismembered her body, disposed of some parts, and hid the rest in his fridge. He confessed to the police, who recovered body parts. The head is still missing.